पुण्यात घरफोड्यांचं सत्र सुरुचं, दिघीत दरवाजाचे कुलूप तोडून ऐवज लंपास

पुणे : दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरलेल्या चोरट्यांनी पावणे तीन लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना दिघी येथील काटे वस्ती येथे घडली. याप्रकरणी समीर दिनकर कोपर्डे (रा. काटे वस्ती, दिघी) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.
Advertisement
आरोपी दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरले. त्यानंतर फिर्यादी यांच्या भावाच्या बेडरूमची बाहेरून कडी लावून लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने, चांदीची ताटे व रोकड असा एकूण दोन लाख ८२ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर
Advertisement




