प्रेम प्रकरणातुन तरुणीवर अॅसिड हल्ला करणा-या आरोपीतास २४ तासाच्या आत..!

कर्नाटक हुबळी येथुन केले जेरबंद

दिनांक २०/०५/२०२६ रोजी रात्री ०१/३० वा. सुमारास ताडीवाला रोड भागात एक तरुणीवर प्रेम प्रकरणातुन अॅसीड हल्ला करण्यात आला होता. त्यात संबंधित तरुणी खंभीर जखमी झाली होती. सदरबाबत बंडगार्डन पोलीस स्टेशन गु.र.नं.१३५/२०२६ भा.न्या.सं.क. १२४ (१), ३५१/३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशान्वये खंडणी विरोधी पथक-२, व युनिट ६ गुन्हे शाखा पुणे शहर असे तपास करीत असताना ताडीवाला रोड तसेच पुणे स्टेशन परिसरातील ५० हुन अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एका तरुणाची ओळख पटवुन संबंधित तरुण हा चालुक्य एक्सप्रेस या रेल्वे गाडीत बसुन घटना घडल्यानंतर पळुन गेल्याचे निष्पन्न झाले.

Advertisement

मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-२, व युनिट ६ गुन्हे शाखा पुणे शहर चे पथक आरोपीच्या मागावर रवाना करण्यात आले. सदरचा इसम हा आपली ओळख लपवण्यासाठी तीन वेळा वेशभुषा बदलुन रेल्वेने प्रवास करत होता. तसेच तो स्वःतची ओळख लपवुन तसेच आपली लपण्याची ठिकाणे बदलुन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. संबंधित पथकाने तांत्रिक विश्लेषनाचे आधारे आरोपीची माहिती घेवुन सदर जाणा-या ट्रेनच्या मार्गावर कार्यरत असणा-या आरपीएफ पथकाची मदत घेवुन नवीन बस स्टॉप गोलक रोड हुबळी राज्य कर्नाटक या ठिकाणी सापळा रचुन शिताफीने ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याचे त्याने नाव श्रीराम वधु सावनेर वय ३० वर्षे, रा. ग्राम तारण वाडा तहसील आमला जिल्हा बैतुल राज्य मध्यप्रदेश असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे सदर गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा संबंधित तरुणी सोबत प्रेम संबंधामधुन केल्याचे कबुल केल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा.अपर पोलीस आयुक्त, प्रशासन (अति. कार्य. पोलीस सह आयुक्त) पुणे शहर श्री. संजय पाटील, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्रीमती तेजस्वीनी सातपुते, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. गौहर हसन, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा श्री. राम राजमाने, पोलीस निरीक्षक युनिट ६ गुन्हे शाखा श्री. सुदर्शन गायकवाड यांचे सुचनेप्रमाणे पोलीस अंमलदार सुरेंदर जगदाळे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, तानाजी देशमुख, जामगे, पवन भोसले, काटे, घावटे, कुसाळकर, आढारी, राऊत, शेख, अजिनाथ येडे, उदय राक्षे, आझाद पाटील, प्रशांत शिंदे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page