मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याचा बहाणा करुन २ लाखाची खंडणी उकळणा-या ०५ आरोपींना केले जेरबंद..!

खराडी पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक १३/०५/२०२६ रोजी सायंकाळी १९.०० वा. चे सुमारास सिटी व्हिस्टा बिल्डींग, खराडी येथील इमारतीमध्ये फिल टच स्पा, या स्पामध्ये ०३ अनोळखी पुरुष व ०२ अनोळखी महिला यांनी फिर्यादी यांचे स्पामध्ये जावुन फिर्यादी या त्यांच्या स्पामध्ये वेश्या व्यवसाय चालवतात असे फिर्यादी यांना बोलुन दमदाटी व शिवीगाळ करुन फिर्यादीला त्यांचेविरुध्द पोलीस केस करण्याची धमकी देवुन फिर्यादींना प्रथम २ लाख रुपयाची खंडणीची मागणी करुन फिर्यादीने त्यास नकार दिल्याने फिर्यादींना हाताने मारहाण करुन तडजोडी अंती १.५ लाख रुपयाची खंडणी ठरवुन त्या रकमेपैकी ३० हजार रुपये फिर्यादीकडुन ऑनलाईन खंडणी स्वरुपात घेवुन फिर्यादीविरुध्द वेश्या व्यवसायाचा खोटा गुन्हा नोंद करण्याची धमकी दिल्याने सदर इसमांविरुध्द दिनांक १४/०५/२०२६ रोजी खराडी पोलीस स्टेशन, गु.र.नं १६१/२०२६, भा. न्या. सं.क.३०८ (२),३०८ (३),३०८ (७), ११५ (२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हा हा खंडणी स्वरुपाचा असल्याने मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ७ श्री. सोमय मुंडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पोलीस स्टेशन श्री. संजय चव्हाण यांना सदर गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. चंद्रसेन पालकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे व पोलीस उप-निरीक्षक राहुल कोळपे यांची सदर गुन्हयातील अनोळखी आरोपींचा शोध घेण्याकरीता दोन तपासी पथके तयार करण्यात आली.
तपास दरम्यानतपास पथक अधिकारी सपोनि रविंद्र गोडसे, पोउनि कोळपे व अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही पाहणी करुन अनोळखी पुरुष व महिलाचे वर्णन आधारे त्यामधील एका अनोळखी पुरुषाचे ठावठिकाणाची माहिती गोपनीय बातमीआधारे प्राप्त करुन गुन्हयातील एक अनोळखी पुरुष आरोपी १) प्रतिक जयवंत गायकवाड वय ३१ वर्षे, रा. लाडोबा वस्ती, रामदत्त निवास, केसनंद-वाडेगाव रोड, केसनंद यास केसनंद फाटा, वाघोली येथे रात्रीच्या वेळी सापळा रचुन ताब्यात घेतले व त्याचेकडे केलेल्या तपासात आरोपी २) विशाल अशोक साळवे, वय ४० वर्षे रा. एस. एस. शाळे समोर, विश्रांतवाडी येरवडा पुणे व ३) रोहित नागनाथ मांढरे वय ३२ वर्षे रा. सिध्दीविनायक मित्रमंडळा जवळ, येरवडा पुणे व दोन महिला आरोपी यांना दिनांक १४/०५/२०२६ रोजी नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचे तपासात आरोपींकडुन गुन्हयातील ३०,०००/-रु. रोख रक्कम व एक होंडा अॅक्टीव्हा दुचाकी वाहन असा एकुण ७०,०००/-रु. किं.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोजकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ७, पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग, पुणे शहर (अति. कार्य. खराडी विभाग) श्रीमती नुतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पोलीस स्टेशन श्री. संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. चंद्रसेन पालकर यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उप-निरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार मनोज खरपुडे, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, साहेबराव गुंडाळे, अशोक केदार, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव व विलास केदारी यांनी केली आहे.




