१९ वी महाराष्ट्र राज्य पोलीस नेमबाजी स्पर्धा २०२५..!

१९ वी महाराष्ट्र राज्य पोलीस नेमबाजी स्पर्धा २०२५ महाराष्ट्र राज्य पोलीस स्पोर्टस नेमबाजी स्पर्धा २०२५ मध्ये पुणे संघाचे घवघवीत यश १९ वी महाराष्ट्र राज्य पोलीस नेमबाजी स्पर्धा २०२५ महाराष्ट रायफल असोसिएशन मुंबई येथे आयोजीत करण्यात आली होती सदर स्पर्धेमध्ये पुणे व पिपरी-चिंचवड दलातील ०१ अधिकारी व ५ महिला पोलीस अंमलदार नेमबाज खेळाडुनी भाग घेवुन खालीलप्रमाणे वैयक्तीक कामगीरी केली आहे.
१) सहा. पोलीस निरीक्षक श्री राकेश कदम
२५ मीटर सेंटर फायर पिस्टल-सुवर्ण पदक
२५ मीटर स्टँडर्ड पिस्टल रजत पदक
५० मीटर फ्री पिस्टल – कांस्य पदक
२) यास्मीन अब्दुल हमीद सय्यद सहा. पोलीस फौजदार ५०९३ पुणे शहर
१० मीटर एअर पिस्टल – कांस्यपद
३) वैशाली अशोक गोडगे महिला पोलीस अंमलदार ६२७१ नेमणुक पोलीस मुख्यालय पुणे शहर
१० मीटर एअर पिस्टल रजत पदक
४) परविन महेबुब पठाण महिला पोलीस अंमलदार ४९० पिंपरी-चिचवड
१० मीटर एअर रायफल-सुवर्ण पदक
५० मीटर रायफल प्रोन पोझिशन-सुवर्ण पदक
५० मीटर रायफल श्री पोझिशन-सुवर्ण पदक
५) रश्मी स्वप्नील धावडे महिला पोलीस अंमलदार ११२६ नेमणुक पिंपरी-चिचवड
२५ मीटर स्पोर्टस पिस्टल-सुवर्ण पदक
१० मीटर एअर रायफल-सुवर्ण पदक
६) पुनम प्रसाद लांडे महिला पोलीस अंमलदार १५२७ नेमणुक पिंपरी-चिचवड पोलीस आयुक्तालय रायफल इव्हेंट
१० मीटर एअर रायफल-रजत पदक
५० मीटर प्रोन रायफल रजत पदक
५० मीटर श्री पोझिशन रायफल – रजत पदक
एकुण १३ पदके (०६ सुवर्ण,०५ रजत, ०२ कास्य) प्राप्त करुन अखिल भारतील पोलीस स्पोटर्स नेमबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्र पोलीस संघामध्ये निवड झाली आहे. पुणे शहर पोलीस दलाचे सहा. पोलीस निरीक्षक श्री राकेश कदम यांची महाराष्ट्र पोलीस संघाचे संघनायक म्हणुन निवड करण्यात आली आहे. राकेश कदम यांची गेल्या वर्षी जकार्ता इंडोनिशिया येथे झालेल्या एशियन शुटिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघात निवड होवुन भारताचे प्रतिनिधित्व केले आहे पुणे शहर व पिपंरी चिंचवड नेमबाजी संघाने सलग ३ वर्षे राकेश कदम यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पोलीस नेमबाजी स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप प्राप्त केली आहे. अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धा २०२५ ही दि.०१/१२/२०२५ ते ०६/१२/२०२५ पर्यत बीएसएफ इदौर, मध्ये प्रदेश येथे होणार आहे सर्व नेमबाज खेळाडु यांचे मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त प्रशासन श्री. संजय पाटील, मा.अपर पोलीस प्रशासन श्री संजय पाटील, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री पंकज देशमुख मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री निखिल पिंगळे, मा. पोलीस उप-आयुक्त मुख्यालय श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, राखीव पोलीस निरीक्षक श्री देवरे, स्पोर्टस इंचार्ज हिंगे यांनी अभिनंदन करुन अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेकरता शुभेच्छा दिल्या आहेत.




