येरवडा कारागृह पुणे येथुन पळुन गेलेल्या खुनाच्या गुन्हयातील शिक्षाबंदी आरोपीस अटक..!

दिनांक १२/०५/२०२६ रोजी दुपारी १४/०० वा. ते १८/०० वा. दरम्यान येरवडा कारागृह पुणे येथुन खडक पोलीस ठाणे कडील खुनाच्या गुन्हयातील जन्मठेपेची शिक्षा लागलेला आरोपी नामे जनार्दन शंकर अडसुळे, वय ३५ वर्षे रा. पीएमसी कॉलनी नं. १०, म्हसोबा मंदिरा शेजारी, कासेवाडी भवानीपेठ पुणे त्याची शिक्षा चुकवण्याचे हेतुने कायदेशीर रखवालीतुन पळुन गेला होता. त्या बाबत चंद्रकांत सयाजी खांदवे, सुभेदार येरवडा कारगृह पुणे यांनी येरवडा पोलीस ठाणे पुणे येथे त्या बाबत तक्रार दाखल केली असुन त्याचा येरवडा पोलीस ठाणे गु. र. नं. २२३/२०२६ बीएनएस कलम २६२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाचे अनुषंगाने दिनांक १४/०५/२०२६ रोजी वरिष्ठ अधिकारी यांनी आरोपीचा शोध घेणे कामी त्या अनुषंगाने आम्ही स्वतः पोलीस अंमलदार अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, उमेश मठपती, निलेश साबळे, अविनाश दळवी, सुहास डोंगरे, युवराज कांबळे, हेमंत पेरणे, महिला अंमलदार रुक्साना नदाफ, मयुरी जाधव असे मिळून वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने पुणे शहरात गुन्हयांना आळा घालण्याकामी खडक पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंध करणेकामी हदीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अनिकेत बाबर व पोलीस अंमलदार उमेश मठपती यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, दोन दिवसांपर्वी कासेवाडी भवानीपेठ पुणे येथील जनार्दन शंकर अडसुळे याने सन २०१७ मध्ये खडक पोलीस ठाणे येथें मर्डर केला होता. त्या गुन्यामध्ये त्याला शिक्षा लागली असुन तो जेलमधुन पळुन आला असुन तो आत्ता सध्या म्हसोबा मंदिर, १० नं. कॉलनी म्हसोबा मंदिरा जवळ कासेवाडी भवानी पेठ पुणे येथे थांबला असले बाबत माहिती मिळाली.

Advertisement

त्यानंतर मिळालेल्या माहिती बाबत येरवडा पोलीस ठाणे पुणे येथे खात्री केली असता सदर आरोपी बाबत माहिती मिळाली की, येरवडा कारागृह पुणे येथील शिक्षाबंदी सी/१२४४ जनार्दन शंकर अडसुळे यास खडक पोलीस ठाणे गु. र. नं. १०३/२०१७ भादवि कलम ३०२, १८२ या गुन्हयामध्ये मा. अति. सत्र न्यायालय पुणे, यांनी सेशन केस नं. ८०८/२०१७ मध्ये बंद्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली असुन तो दिनांक १२/०५/२०२६ रोजी दुपारी १४/०० वा. ते १८/०० वा. दरम्यान खुले कारागृह येरवडा पुणे येथुन तो त्याची शिक्षा चुकवण्याचे हेतुने कायदेशीर रखवालीतुन पळुन गेला आहे. त्या बाबत तक्रार दाखल असले बाबत माहिती प्राप्त झाली. त्यानंतर आम्ही स्वतः व वरिल स्टाफ सदर मिळालेल्या बातमी ठिकाणी गेलो असता बातमीतील वर्णनाचा इसम हा मिळुन आल्याने त्यास आज दिनांक दि. १४/०५/२०२६ रोजी १२/३० वाजता ताब्यात घेवुन त्यास प्रथम आम्ही

आमची व सोबतच्या स्टाफची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव व पत्ता जनार्दन शंकर अडसुळे, वय ३५ वर्षे रा. पीएमसी कॉलनी नं. १०, म्हसोबा मंदिरा शेजारी, कासेवाडी भवानीपेठ पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांनतर त्यास चौकशी कामी ताब्यात घेवुन युनिट-१ गुन्हे शाखा कार्यालय येथे घेवुन येवुन त्याचे कडे मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने तपास केले असता त्याने सांगितले की, त्यास सन २०१७ चे खुनाच्या गुन्हयात २०२३ साली शिक्षा लागली होती. शिक्षा लागले नंतर त्यांची आत्या रा. कासेवाडी भवानीपेठ पुणे हिची तब्येत खुप खराब असल्यामुळे खुले कारागृह येरवडा पुणे येथुन आत्याला बघण्यासाठी कोणास काहीएक न सांगता पळुन आलो असले बाबत सांगितले. सदर आरोपीस पुढील कारवाई कामी येरवडा पोलीस ठाणे, पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री विवेक मासाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर श्री शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोलीस अंमलदार अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, उमेश मठपती, निलेश साबळे, अविनाश दळवी, सुहास केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page