विद्युत रोहीत्र मधील तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या आरोपींना केले जेरबंद..!

युनिट ७. गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे लोणीकंद, लोणी काळभोर, वाघोली परिसरात वीज वितरण महामंडळ करुन वीज पुरवठा करीता उभारण्यात येणा-या विद्युत रोहीत्र / ट्रान्सफॉर्मर (डी.पी.) मधील तांब्याच्या तारा राजरोजसपणे चोरी करुन त्यातील तांब्याच्या तारांची विक्री करत असलेबाबत त्यास प्रतिबंध करणेकरीता पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे यांना माहिती मिळाली की, ट्रान्सफॉर्मर / रोहीत्र मधील तांब्याच्या तारा चोरी करणारे आरोपी हे थेऊर गावाकडून कोलवडीकडे एका पांढऱ्या रंगाचे टेम्पो क्रमांक MH47 Y 0676 या टेम्पोमधुन चोरीचा माल घेवुन जाणार आहेत. अशी माहिती मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट ७ श्री संतोष सोनवणे यांना कळविली असता त्यांनी बातमीप्रमाणे खात्री करुन कायदेशिर कारवाई करण्याबाबत कळविले. त्याप्रमाणे केसनंद थेउर रोडवर कोलवडी ब्रिजजवळ रोडचे कडेला सापळा रचुन बातमीमधील क्रमांकाचा टेम्पो पोलीस स्टाफचे मदतीने ताब्यात घेतला व सदर टेम्पोची झडती घेता त्यामध्ये तांब्याच्या तारांनी भरलेली एकुण ९ पोती मिळुन आली सदर टेम्पोमधील दोन इसम नामे १) नुरहसन खलील खान, वय २७ वर्षे, रा. सर्वे नंबर ३८ एकनाथ पठारेवस्ती चंदननगर पुणे. मुळ पत्ता राज्य उत्तरप्रदेश. २) भैय्याराम पट्टे यादव, वय २२ वर्षे, पत्ता दिवेगाव सासवड ता. पुरंदर जि. पुणे. मुळ पत्ता राज्य उत्तरप्रदेश यांचेकडे सदर तांब्याच्या तारांबाबत विचारपुस करता त्यांनी साथीदारांसह लोणीकाळभोर, लोणीकंद व आजुबाजुचे परीसरात ट्रान्सफॉर्मर / डीपी मधील तांब्याच्या तारा चोरी केले असल्याचे सांगीतले. सदर इसमांकडुन तांब्याच्या तारा व टेम्पो असा एकुण ११,३७,५००/- रु.की. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरबाबत लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कडील ०२, लोणीकंद पोलीस स्टेशन कडील ०२, वाघोली पोलीस स्टेशन कडील ०२ असे एकुण ०६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री राजेंद्र मुळीक, युनिट ७ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांचे सुचनांप्रमाणे गुन्हे शाखा, युनिट ७ कडील सहा पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, ऋषिकेश ताकवणे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, निर्णय लांडे, विनायक साळवे, नेहा तापकीर, नितिन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, महिला पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.




