दखलपात्र गुन्हा करण्याचे तयारीत असलेले सख्खे भावांकडुन एक गावठी बनावटीचे पिस्टल, ५ जिवंत काडतुसे व धारदार लोखंडी चाकु जप्त..!

दिनांक १४/०५/२०२६ रोजी वानवडी पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक, उमाकांत महाडिक व पोलीस अंमलदार असे वानवडी पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार अभिजीत चव्हाण यांना त्यांचे बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, एका चॉकलेटी रंगाची अॅक्टीवा स्कुटरवर दोन संशयित इसम फिरत असुन ते कोणता तरी दखलपात्र गुन्हा करणेचे उद्येशाने आपले कब्जात अग्निशस्त्र जवळ बाळगुन वावरत आहेत. अशी बातमी मिळाल्याने सदरबाबत वरिष्ठांना कळवुन त्यांचे परवानगीने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी छापा कारवाई केली असता बातमीप्रमाणे दोन इसम त्यांचेकडील अॅक्टीवा मोपेडवर मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) साहील रफिक शेख, वय २१ वर्षे, रा. स.नं. ३१६, खजुरेवस्ती, राजा बकशार दर्गाजवळ, वैदवाडी, हडपसर, पुणे २) सद्दाम रफिक शेख, वय २५ वर्षे, रा. सदर असे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता साहील रफिक शेख याचेजवळ एक लोखंडी धारदार चाकु व सद्दाम रफिक शेख याचेजवळ एक लोखंडी पिस्टल, मॅगझिन व ०५ जिवंत काडतुसे व अॅक्टीवा मोपेड असे एकुण १,१२,८००/-रु. कि.चा मुद्देमाल विनापरवाना जवळ बाळगल्याचे मिळुन आला. सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्यांचेविरुध्द वानवडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २१६/२०२६ भारतीय शस्त्र अधि कलम ३ (२५), ४ (२५) महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दाखल गुन्हयात नमुद आरोपीतांना अटक करण्यात आलेली असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास हे सहा. पोलीस निरिक्षक- उमाकांत महाडिक हे करीत आहेत.

Advertisement

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग पुणे शहर श्रीमती नम्रता देसाई यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता जाधव यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाने, अभिजित चव्हाण, विठ्ठल चोरमले, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, बालाजी वाघमारे, विष्णु सुतार, अर्शद सय्यद, आशिष कांबळे व कैलास सपकाळ यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page