चोरी केलेले मोबाईलचे IMEI नंबर क्रेक करून विक्री करणाऱ्यांना बेड्या,160 हून अधिक मोबाईल जप्त

मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे. मुंबईत मोबाईल चोरी केलेले मोबाईल विकत घेऊन मग त्यांचा आयएमइआय क्रमांक बदलून ते परराज्यात विकणाऱ्या आणखी आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीकडून 162 मोबाईल फोन, एक लॅपटॉप अशी एकूण 15 लाख 88 हजार आठशे रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या टोळीतील पाच आरोपींना अटक केली आहे.

मुंबई पोलीस गुन्हे शाखा कक्ष-6 यांना गुप्त माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती व त्याच्या साथीदारासह चोरीचे मोबाईल खरेदी करून त्यांचे आयएमईआय क्रमांक बदलून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी आठवडाभर सातत्याने गोपनीय माहिती गोळा करून आरोपी व इतर साथीदार यांचे मोबाईल खरेदी करून त्यांची साठवणूक कुठे करतो. मोबाईलची विक्री कशी व कधी करतो याचा सगळा अभ्यास पोलिसांनी केला होता. त्यानंतर पोलिसांनी शिवाजीनगर मुंबई या ठिकाणी मुख्य आरोपी याच्या घरावर धाड टाकली. तसेच, तीन मोबाईल विक्री दुरुस्ती करणाऱ्या दुकानावर ही पोलिसांनी छापा टाकून एकूण 162 मोबाईल फोन एक लॅपटॉप असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Advertisement

आरोपीने पोलिसांना सांगितले की, मुंबई शहरातील तसेच राज्यातील विविध परिसरातून चोरी केलेले, स्नॅचिंग केलेले, बिग पॉकेटिंग केलेले मोबाईल विकत घेऊन त्यांचा आय एम इ आय क्रमांक लॅपटॉपच्या द्वारे बदलून ते मोबाईल फोन देशातील विविध राज्यात विक्रीकरिता पाठवत असल्याचे आरोपीने कबुली केले आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालय समोर हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई विवेक फणसळकर (विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई) देवेन भारती पोलीस सह आयुक्त (गुन्हे), लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-1), विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त (डि पूर्व), चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे, पोलीस निरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे, पोलीस उपनिरीक्षक मुठे,रहाणे, माशेरे, बेळणेकर, सावंत,सकपाळ,आव्हाड, सहाय्यक फौजदार देसाई,पारकर, पोलीस हवालदार तुपे,जाधव,वानखेडे,शिंदे,गायकवाड, मोरे, भालेराव, पोलीस शिपाई घेरडे,माळवेकर,कोळेकर, महिला पोलीस शिपाई अभंग, सुतार, पोलीस हवालदार डाळे, कदम, जायभाये आणि पाटील यांच्या पथकाने पार पाडली आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- संतोष लांडे

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page