मौजमजा करण्यासाठी नागरिकांचे मोबाईल हिसकावणा-या आरोपींना ठोकल्या बेडया..!

येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सह्याद्री हॉस्पिटल समोर गल्लीमध्ये एक इसम रात्रीचे जेवन झाल्यानंतर शतपावली करुन मोबाईल फोन पहात असताना दोन अज्ञात इसमांनी मागुन येऊन त्यांचे हातातील मोबाईल फोन हिसकावुन चोरी करुन घेऊन गेले बाबत दि.२९/०४/२०२६ रोजी येरवडा पोलीस स्टेशन येथे गुरनं. २१३/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०४, ३(५) अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर बाबत तात्काळ आरोपींना ताब्यात घेणेबाबत मा. वरीष्ठांनी सुचना दिल्या होत्या.

सदर सुचनांच्या अनुषंगाने मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४, श्री. चिलुमूला रजनिकांत, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्री. सुनिल जैतापुरकर, यांनी देखील सदरबाबत सुचना केल्या होत्या. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे पोलीस अंमलदार साईनाथ म्हस्के यांना गुन्हा दाखल झालेनंतर अवघ्या काही तासातच त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपी हे चोरी केलेले मोबाईल फोन विक्री करीता येणार असलेबाबतची खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्याने सपोनि प्रसन्न जराड, पोलीस अंमलदार राहुल ठोंबरे, किरण गंभीरे यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचुन बातमीदाराने आरोपीने परीधान केलेल्या वेशभुषा वर्णनावरुन संशयित इसमांवर पाळत ठेऊन संशयित इसम यांना पोलीस आल्याची चाहुन लागताच पळुन जाण्याचे तयारीत असताना त्यास शिताफीने ताब्यात घेतले त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १. राजकुमार सोनु पाटील, वय- १९, रा-राजगुरु चौक, गणपती मंदिरा मागे ताडीवाला रोड, बंडगार्डन, पुणे २. गौरव बाळु खुडे, वय-१८, रा-सी बिल्डींग आठवा माळा, अपर व्हिआयटी, बिबवेवाडी, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांचे कडे पांढ-या रंगाच्या पिशवी मध्ये असलेल्या एकुन १९ मोबाईल फोन बाबत विचारले असता त्यांनी कालची चोरी केल्याप्रमाणे पुणे शहर व परीसरातुन अनेक मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिली. मोबाईल चोरी करण्यासाठी वयोवृध्द इसम तसेच महिला या निर्जन स्थळी असताना पाळत ठेऊन ते बेसावध असताना त्यांचे हातातुन मोबाईल फोन हिसकावुन घेऊन पळुन जात होते. तसेच पुणे स्टेशन, रेल्वे स्टेशन अशा गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन अनेक प्रवाशांच्या खिशातून मोबाईल फोन चोरी केल्याचे चौकशी दरम्यान सांगितले आहे. सदर आरोपींकडुन ४३ मोबाईल फोन जप्त करण्यात आले असुन एकुण २.६५.५००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नमुद आरोपींना पुढील कारवाईसाठी येरवडा पोलीस स्टेशन येथे आणले असुन पुढील तपास पो. उपनिरी. किशोर बेरड हे करत आहेत.

Advertisement

सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४, श्री. चिलुमूला रजनिकांत, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्री. सुनिल जैतापुरकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन श्री. अंजुम बागवान, पोनि (गुन्हे), श्री. विजय ठाकर, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक किशोर बेरड, पोलीस अंमलदार शैलेश वाबळे, मुकुंद कोकणे, संदिप जायभाय, साईनाथ म्हस्के, नटराज सुतार, बालाजी सोगे, गणेश पालवे, अनिल मन्हाळकर, राहुल ठोंबरे, किरण गंभीरे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page