Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर..!

भोरमधील नसरापूर गावात एका ४ वर्षांच्या मुलीचा बलात्कार करून तिची हत्या झाली आहे. या संतापजनक घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे आलेल्या एका ४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली. ही संतापजनक घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापुर गावात घडली आहे. ही अल्पवयीन मुलगी नसरापूरला सुट्टीनिमित्त तिच्या आजीकडे राहण्यासाठी आली होती. शुक्रवारच्या दुपारी नसरापूर राम मंदिर परिसरात खेळत होती. त्यावेळी नराधमाने तिला आमिष दाखवून तेथून जवळच असलेल्या एक गुरांच्या गोठ्यात नेऊन निर्दयीपणे अत्याचार केला, त्यानंतर तिचा खून केला.
Advertisement




