अंमली पदार्थाची विक्री करणारे दोन इसमास जेरबंद करुन, त्यांचेकडून २२ किलो गांजा जप्त..!

मा. वरिष्ठांनी पुणे शहरातील अंमली पदार्थ विक्रीचे अवैद्य धंद्यावर कारवाई करणेकामी मार्गदर्शनपर सुचना दिल्याने मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर यांनी परिमंडळ ०५ पथकास अंमली पदार्थाचे अनुषंगाने कारवाई करणेकामी आदेशित केले होते.

त्या अनुषंगाने दि.२९/०४/२०२६ रोजी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर कडील पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार असे परिमंडळ ०५ हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख यांना गोपनीय बातमी मिळाली की, कोंढवा पोलीस स्टेशन पुणे येथील गल्ली नं.३०, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे येथे एक महिला व एक पुरुष इसम त्याचे ओळखीचे लोकांना गांजा या अंमली पदार्थाची विक्री करीत आहेत. सदरची माहिती मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, यांना सांगितली असता त्यांनी सदर बातमीचे अनुषंगाने खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. सदर आदेशाप्रमाणे परिमंडळ ०५ पुणे शहर कडील पथक व कोंढवा पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार असे गल्ली नं.३०, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे येथे संयुक्तपणे छापा कारवाई केली असता छापा कारवाईमध्ये महिला आरोपी १) यास्मीन करीम शेख, वय ४५ वर्षे, रा.गल्ली नं.३०. शिवनेरीनगर कोंढवा पुणे व २) आमिर समीर शेख, वय १९ वर्षे, रा. सदर यांच्या ताब्यात २१.१९८ किलो ग्रॅम बिया बोंड्यासह गांजा हा अंमली पदार्थ, रोख रक्कम, मोबाईल व इतर मुद्देमाल असा एकुण ९,७४,९६०/- रु.की.चा ऐवज मिळुन आल्याने त्याचेविरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ३२८/२०२६ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जगताप, कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.

Advertisement

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि कुमार घाडगे, पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख, रविंद्र गावडे, पोलीस अंमलदार, प्रविण उत्तेकर, सर्फराज देशमुख, कैलास सपकाळ, हणमंत कांबळे, पुजा चोरमले, विशाल मेमाणे, अमोल हिरवे, स्वागत पळसे, अमित सुर्यवंशी, शंकर माटे, सिध्देश झेंडे, दत्तात्रय धुमाळ महिला पोलीस अंमलदार पुजा नागरगोजे, आर्या सांळुके यांचे पथकाने केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page