पुण्यातील मंडई मेट्रो स्थानकाला भीषण आग; मोदींनी नुकतंच केल होतं उद्घाटन

पुणे : महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रोस्थानकात रविवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळतात अग्निशामक दलाचे पाच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. मध्यरात्री 12 च्या सुमारास मंडईच्या मेट्रो स्टेशनला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दल त्या ठिकाणी दाखल झाले. आग लागली तेव्हा प्रवाशांची वर्दळ नव्हती. यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
26 सप्टेंबर रोजी या मेट्रोस्थानकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं होतं. काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झालेल्या या स्थानकाला आग लागल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मेट्रोचे काम अर्धवट असताना त्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यात अशी घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




