तब्बल १०,३५,०००/-रू. किंमतीच्या एकुण २०७० नकली नोटा जप्त..!
एकुण ५ आरोपीस केले जेरबंद…

तब्बल १०,३५,०००/-रू. किंमतीच्या एकुण २०७० नकली नोटा जप्त
एकुण ५ आरोपीस केले जेरबंद
दि.०८/१०/२०२४ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री छगन कापसे यांचे आवेशाने सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलबार असे सहकारनगर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पुणे सातारा रोडवरील पद्मावती बसस्टॉपसमोर आलो असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलीक यांना एक इसम गडबडीने स्वारगेटचे दिशेने जावु लागल्याचा विसला त्याचा संशय आल्याने त्याचा पाठलाग करुन त्यास थोड्याच अंतरावर जागीच पकडुन त्यास आम्हास पाहुन गडबडीत निघुन जाण्याचे कारण विचारुन त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्यांचे नाव निलेश हिरानंद विरकर वय ३३ वर्षे व्यवसाय नोकरी रा. विष्णु गावडे चाळ रेल्वे रिझव्हेंशन सेंटर जवळ चिंचवड स्टेशन समोर चिंचवड पुणे असे सांगितले सदर इसमास तेथुन गडबडीत निघुन जाण्याचे कारण विचारता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला. त्याचेकडे विचारणा करीत असताना तो त्याचे पॅटचे डावे खिशात सारखा हात घालुन काहीतरी लपवीत असल्याचे दिसल्याने व त्याचा संशय आल्याने त्याचे खिशे तपासुन पाहता त्याचे खिशात ५००/-रुपये किमतीच्या नोटांचा एक बंडल मिळुन आला. त्याबाबत त्याचेकडे विचारपुस केली असता तो कोणतेही समाधानकारक उत्तर देवु शकला नाही. त्यास पुन्हा विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, सवरच्या नोटा नकली असुन त्या मी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवुन नकली नोटा चलनात चालविण्यासाठी जवळ बाळगल्या होत्या असे सांगीतले. सदर आरोपीचे ताब्यातुन ५००/-रुपये दराच्या एकुण २५० नकली चलनी नोटा गुन्हयाचे पुरावेकानी जप्त करण्यात आल्या असुन सहकारनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ३३९/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. छगन कापसे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सपोनि सागर पाटील व पोलीस अंमलदार करीत असताना सदरच्या नकली नोटा आरोपी निलेश विरकर याला कोपर खेरने नवी मुंबई येथील १) शाहीव कुरेशी २) संफान पटेल ३) अफजल शहा यांनी त्याला दिल्या असल्याची माहिती त्याने दिली त्यावरुन वि.१९/१०/२०२४ रोजी सैफान कैयुम पटेल वय २६ वर्षे रा. सेक्टर १२ ई सत्तार पडन बिल्डींग कोपर खेरने नवी मुंबई अफजल समसुद्दीन शहा वय १९ वर्षे रा. सेक्टर १२ ई झमझम अपार्टमेंट कोपर खेरने नवी मुंबई यांना सदरच्या गुन्हयात अटक करण्यात आली असुन दि.२२/१०/२०२४ रोजी शाहीद जक्की कुरेशी वय २५ वर्षे धंदा चिकन सेंटर रा. सेक्टर १२ ई झमझम अपार्टमेंट दुसरा मजला घर नं.२०२ कोपर खेरने नवी मुंबई यास अटक करण्यात आली.
आरोपी शाहीद कुरेशी यास विश्वासात घेवुन तपास करता त्याला नकली नोटा शाहफहड अंसारी याचेकडुन आल्याची व त्याचेकडे आणखी काही नकली नोटा असल्याची त्याने माहिती दिली. त्यावरुन दि.२५/१०/२०२४ रोजी शाहफहड ऊर्फ सोनु फिरोज अंसारी वय २२ वर्षे रा. जन्मत वेल्फेअर सोसायटी मीना अपार्टमेंट चौथा मजला रुम नं.४११ साडी कंपाऊंड नालासोपारा पुर्व पालघर ठाणे यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असुन सदर गुन्हयात १. निलेश हिरानंद विरकर २. सैफान कैयुम पटेल ३. अफजल समसुद्दीन शहा ४. शाहीद जक्की कुरेशी ५. शाहफहड ऊर्फ सोनु फिरोज अंसारी असे एकुण ५ आरोपीना अटक करण्यात आली असुन त्यांचे कडुन ५०० रुपये दराच्या १०,३५,०००/-रू. किंमतीच्या एकुण २०७० नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
शाहफहड ऊर्फ सोनु फिरोज अंसारी याचे कडे तपास करता सदरच्या नकली नोटा त्याने विल्ली तसेच गाझीयाबाद, राज्य उत्तर प्रदेश येथुन आणल्याचे सांगितलेने सहकारनगर पोलीस स्टेशन कडील पथक गाझीयाबाव, राज्य उत्तर प्रदेश येथे जावुन सवर गुन्हयाचे अनुशंगाने तपास करत आहेत.
सवरची कामगीरी मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ २. पुणे श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. छगन कापसे, यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा.पो.उप-निरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलवार अमोल पवार, महेश मंडलिक, किरण कांबळे, चंद्रकांत जाधव, बजरंग पवार, अमित पदमाळे, सागर सुतकर, अभिजीत वालगुडे, महेश भगत खंडु शिंदे, योगेश ढोले यांनी केली आहे.
संपादक -आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039




