रिक्षाची तरुणीला धडक लागली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर भरधाव रिक्षाच्या धडकेत पादचारी तरुणी जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी रिक्षाचालकावर फरासखना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुरभी अनिल दिवाणजी (वय २१, रा. केदारेश्वर अपार्टमेंट, कसबा पेठ ) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी चालक मंगेश विश्वनाथ सूर्यवंशी (वय २६, रा. खराडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात केला आहे. याबाबत सुनील मुरलीधर दिवाणजी (वय ५५) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
१४ ऑक्टोबर रोजी सुरभी दिवाणजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास छत्रपती शिवाजी रस्त्यावरुन जात होत्या. त्यावेळी कसबा पेठ पोलीस चौकी परिसरातील चौपाटीजवळ भरधाव रिक्षाने सुरभी यांना धडक दिली. यात सुरभी यांना गंभीर दुखापत झाली. पोलीस उपनिरीक्षक जवळगी तपास करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




