मोबाईल चोरीच्या गुन्हेगारास ०४ तासात पकडुन ६६ हजाराचा मुद्देमाल केला जप्त..!

चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत श्रीराम निवास साईनाथनगर भागामधील घरामधुन एकुण ०७ मोबाईल चोरीस गेलेबाबत दि.२७/०४/२०२६ रोजी चंदननगर पो. स्टे येथे गु.र.नं.१७१/२०२६ भा.न्या.सं.क. ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे अनुषंगाने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणाव्दारे इसम नामे वेदांत गणेश चव्हाण वय १९ वर्षे रा. मांजरी पुणे यांच्यावर संशय असल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसुन तपास करुन त्याच्याकडुन दाखल गुन्हयातील एकुण ०७ मोबाईल व इतर असा एकुण ६६,०००/- रु.किं.चा मुद्देमाल हस्तगत करुन सदरचा गुन्हा अवघ्या ०४ तासात उघडकीस आणलेला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-७ पुणे शहर, श्री. सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस स्टेशन श्री. निलेश बडाख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अमोल धस, पुणे यांचे सुचनांप्रमाणे सहा. पो. निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार टि. आर. लिंगाण्णा, गुरव, डांगे, बेंद्रे व लहाने यांनी केलेली आहे.




