आमदार नरहरी झिरवाळांनी मंत्रालयातील जाळीवर मारली उडी, नेमकं काय घडलं?

मुंबई – सत्ताधारी पक्षात असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी सीताराम झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. उड्या मारण्यापूर्वी झिरवळ यांच्यासह काही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. ही भेट निष्फळ ठरल्यानंतर झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी जाळीवर उड्या मारल्या. एसटीच्या आरक्षणास धक्का लागू नये, ही मूळ मागणी आमदारांची आहे. पेसा कायद्यांतर्गत भरती करण्याची मागणी या आमदारांची आहे.

काय आहे आमदारांची मागणी ?

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार आज आदिवासी समाजातील आमदार आणि नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना एक तासाच्या प्रतीक्षेनंतर भेटले. यावेळी त्यांनी आरक्षण आणि अन्य मागण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. परंतु या चर्चेतून कोणताही ठोस निर्णय निघाला नाही. त्यापूर्वी त्यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची ही आदिवासी समाजातील आमदारांनी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये. ही मुख्य मागणी आदिवासी समाजातील आमदारांनी केली. परंतु यावर मुख्यमंत्र्यांनी कुठलंही ठोस उत्तर दिले नाही. त्यामुळे आपली मागणी मान्य व्हावी, यासाठी आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर चढून आंदोलन केलं.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page