वृक्षसंवर्धन आणि फिटनेसचा संगम; वृक्षाथॉन फाउंडेशनच्या VHM Edition 5.0 साठी विशेष प्रमोशन उपक्रम..!

वृक्षसंवर्धन आणि फिटनेसचा संगम वृक्षाथॉन फाउंडेशन – VHM Edition 5.0 साठी विशेष प्रमोशन उपक्रम
पुणे, दि. २४ एप्रिल २०२६ : शारीरिक तंदुरुस्तीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या वृक्षाथॉन फाउंडेशन VHM Edition 5.0 या उपक्रमाच्या प्रसारासाठी विशेष प्रमोशन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला पोलीस विभागाकडून आयर्नमॅन एसीपी विष्णू ताम्हाणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी भविष्यातील जीवनमान अधिक आनंददायी आणि निरोगी होण्यासाठी वृक्षसंवर्धन आणि शारीरिक स्वास्थ्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, नागरिकांनी मोठ्या संख्येने वृक्षाथॉनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या विशेष प्रमोशन उपक्रमात सिने कलाकार भारती आचरेकर, नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी आणि पुष्कराज चिरपुटकर यांनी उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदविला. त्यांच्या उपस्थितीमुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिक प्रभावीपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचला.
वृक्षाथॉन फाउंडेशनचे संस्थापक विजय गायकवाड आणि साधना शाह तसेच सहायक संचालक विशाखा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी टीममधील संतोष मोरे (सदस्य), पियुषा लुनावत (मार्केटिंग डायरेक्टर), अनिल सावंत तसेच ‘आपले सखी’ संस्थेच्या संचालिका संगीता तरडे उपस्थित होत्या.
वृक्षाथॉन फाउंडेशन – VHM Edition 5.0 हा केवळ धावण्याचा कार्यक्रम नसून पर्यावरण संवर्धनासाठी एक सामाजिक आणि प्रेरणादायी पुढाकार आहे. झाडे लावणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
हा भव्य वृक्षाथॉन सोहळा दि. ७ जून २०२६ रोजी, पोलीस ग्राउंड, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. हा उपक्रम पुणे पोलीस, वनविभाग आणि फिटनेस फर्स्ट इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित केला जात आहे.
विविध वयोगटांसाठी स्वतंत्र रन कॅटेगरीज आहेत. पर्यावरणपूरक आणि स्वास्थ्यवर्धक अशा या उपक्रमात पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
रेस श्रेणी :
- ०३ किमी – ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी वॉक
- ०५ किमी – नवोदित आणि उत्साही धावपटूंकरिता रन/जॉग
-१० किमी – ड्रीम रनर्स आणि एलिट अथलिटिस साठी
- २१ किमी – सर्व धावपटूंसाठी हाफ मॅरेथॉन
आयोजक यांचे कडून नागरिकांना आवाहन: पर्यावरण संवर्धन आणि शारीरिक तंदुरुस्ती यांचा संदेश घेऊन आयोजित करण्यात येणाऱ्या या वृक्षाथॉनमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.
नोंदणीसाठी अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्याः




