रेस्टॉरंट अॅण्ड बारमध्ये चोरी- सव्वा लाखांची रोकड व दारू चोरली…!

पुणे, धानोरी भागातील एका रेस्टॉरंट अॅण्ड बारमध्ये चोरट्यांनी चोरीकरून गल्ल्यातील १ लाख १८ हजारांची रोकड, ५ मोबाईल व दारूच्या बाटल्या असा २ लाख १५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संदेश शिंदे (३६, रा. शिंदे वस्ती) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनूसार, शिंदे यांची धानोरी भागात एन्जॉय रेस्टॉरंट अॅण्ड बार नावाने अस्थापना आहे. अस्थापना बंद असताना चोरट्याने रेस्टॉरंटमधील किचनच्या दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. नंतर गल्यातील रोकड आणि दारूच्या बाटल्या घेवून चोरटा पसार झाला. सोमवारी सकाळी ही घटना समोर आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. बारमधील चोरी करताना एकजण सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड पुढील तपास करत आहेत
संपादक -आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039




