खुनाच्या गुन्हयात ०६ वर्षापासुन पाहिजे असलेला आरोपी पोलीसांच्या जाळयात..!

चंदननगर पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं.१८८/२०१९ भा.द.वि.क.३९५,३९६,३६४,३४२,३२३,५०६,२०१ आर्म अॅक्ट कलम ४(२५) अन्वये दाखल आहे. दाखल गुन्हयात एकुण ०८ आरोपी असुन यातील आरोपींनी फिर्यादीचे दोन मोबाईल, गळयातील सोन्याची चैन, हातातील ब्रेसलेट, घडयाळ व चारचाकी गाडी असा एकुण ३,६५,०००/-रु किंमतीचा मुददेमाल जबरदस्तीने फिर्यादीच्या ताब्यातुन घेतल्याने फिर्यादी यांनी दिले तक्रारी वरून वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयाचे तपासामध्ये फिर्यादी यांचे सोबतच आरोपी यांनी फिर्यादी यांचे सोबत असलेला त्यांचा मित्र राहुल शिवाजी शेलार, वय-२४ वर्षे, रा-दातेवाडी, ता-खटाव, जि-सातारा यास फिर्यादी यांचे बरोबर कॉर्नेट लॉज खराडी पुणे येथुन बाहेर घेवून जावून त्याचेवर वार करुन जीवे ठार मारले तसेच त्याचा खुन केल्यानंतर त्याची बॉडी नदीच्या पाण्यात फेकुन देवुन गुन्हयातील पुरावा नष्ट केल्यावरुन सदर गुन्हयात भा.द.वि. कलम ३९६,२०१ अन्वये कलम वाढ करण्यात आली आहे.

सदर गुन्हयाच्या तपासात चंदननगर पोलीसांनी एकुण ०७ आरोपींना अटक केली असुन सदरचा गुन्हा हा सध्या न्यायप्रविष्ट आहे. परंतु सदर गुन्हयातील पाहिजे असलेला मुख्य आरोपी तेजस अमृत ढेरे हा गुन्हा दाखल झाल्यापासुन परांगदा झाल्याने तो अदयाप पावेतो फरार होता. त्याचेविरुद्ध पुढील प्रमाणे गुन्हे दाखल आहे.

अ.क्रं पोलीसस्टेशन नाव

गु.र.क्रं व कलम

१) खडक पोलीस ठाणे, पुणे शहर

६६/२०१५ भा.द.वि ३०७,१२० ब, १४३,१४७,१४८,१४९ आर्म अॅक्ट ३ (२५)

मपोका १३५ मोका कलम ३(१), ३ (२), ३(४).

२) शिरुर पो.स्टे.पुणे ग्रामीण

६८/२०१५ भा.द.वि ४३८,३९२,३४ प्रमाणे.

३) मुंढवा पो.स्टे. पुणे शहर

३०३२/२०१५ आर्म अॅक्ट कलम ४,७,२५ मपोका ३७ (१) सह १३५ प्रमाणे १८८/२०१९ भादवि कलम ३९५,३९६,३६४,३४२,३२३,५०६, २०१ आर्म

अॅक्टकलम ४, २५ अन्वये.

४) चंदननगर पो.स्टे. पुणे शहर

Advertisement

दिनांक २५/०४/२०२६ रोजी पहाटे ०३/०० वा. चे सुमा. खराडी पोलीस स्टेशनच्या रात्रपाळी तपास पथकातील पोलीस अंमलदार पोलीस अंमलदार दत्त्ताञय खरपुडे, अशोक केदार हे पोलीस स्टेशन हददीत गस्त करीत असताना त्यांना खबर प्राप्त झाली की, वर नमुद गुन्हयातील पाहीजे/फरार आरोपी तेजस अमृत ढेरे हा खराडी परिसरात येणार आहे. सदरची माहिती प्राप्त होताच त्यांनी सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पोलीस स्टेशन श्री. संजय चव्हाण यांना दिली असता त्यांनी नमुद पाहीजे आरोपी यास तात्काळ ताब्यात घेवुन पुढील कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार रात्रपाळी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक संतोष म्हेत्रे व पोलीस अंमलदार दत्त्ताञय खरपुडे, अशोक केदार यांनी प्राप्त खबरीच्या अनुषंगाने प्यासा हॉटेलच्या पाठीमागे, उबाळे नगर, खराडी, पुणे येथे पहाटे सुमारास

सापळा रचुन आरोपी तेजस अमृत ढेरे यास त्याचेकडील वाहनासह ताब्यात घेतले आले व त्याचेकडे नमुद गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देवुन असमाधानकारक माहिती दिल्याने त्यास वाहनासह ताब्यात घेवुन त्यास पोलीस स्टेशनला आणुन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव तेजस अमृत ढेरे, वय ३६ वर्षे रा. अलका उत्तम बिल्डींग, दत्त चौक, मुंढवा रोड, पुणे असे सांगितले व त्याने गुन्हा दाखल केल्यापासुन ०६ वर्षापासुन परागंदा झाल्याची कबुली दिलेली आहे. नमुद वेळी आरोपी तेजस ढेरे याचेकडे मिळुन आलेली मोटार सॅन्ट्रो कार नं एमएच-०५/एबी-२६०४ ही जप्त करण्यात आली आहे व नमुद आरोपीस पुढील कारवाई करीता चंदननगर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री. मनोजकुमार पाटील मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ७, पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, खराडी विभाग, पुणे शहर, श्रीमती नुतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पोलीस स्टेशन, श्री. संजय चव्हाण, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गोडसे, पोलीस उप-निरीक्षक श्री. राहुल कोळपे, पोलीस अंमलदार दत्तात्रय खरपुडे, अशोक केदार, महेश नाणेकर, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, विलास केदारी व साहेबराव गुंडाळे सर्व नेमणुक खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page