खडक पोलिसांनी नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल केले परत; नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक

पुणे : रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड, न्यायालय, तहसीलदार, सरकारी रुग्णालये या विविध वर्दळीच्या ठिकाणाहून नागरिकांचे गहाळ झालेले 25 मोबाइल खडक पाेलिस ठाण्याच्या पाेलिसांनी शाेधून काढले. नागरिकांना आज हे माेबाइल फाेन परत करण्यात आले. यावेळी माेबाइल परत हातात मिळाल्याच्या आनंदाने नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. पोलिसांनी चार लाख किमतीचे 25 मोबाईल नागरिकांना परत दिले आहेत.

Advertisement

खडक पोलिसांनी चोरीला गेलेल्या, गहाळ झालेल्या मोबाईलच्या तक्रारी सी. ई. आय. आर या पोर्टलमध्ये तक्रार नोंदवून शोध घेतला. ४ लाख किंमतीचे २५ मोबाईल परत मिळविण्यात यश पोलिसांना आले. हे मोबाईल शुक्रवारी (१९ जुलै) रोजी पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल यांच्या हस्ते नागरिकांना परत देण्यात आले आहे. त्या मोबाईल मध्ये महत्वाचा डाटा, कागदपत्रे असल्याने संबंधित नागरिक त्रस्त होते. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी खडक पोलिसांचे धन्यवाद मानले.

ही कारवाई उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, सहाय्यक पोलीस आयुक्त मछिंद्र खाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, पोलीस अंमलदार सागर कुडले यांनी केली.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page