दोन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; पुणे जिल्ह्यातील संतापजनक प्रकार

पुणे : भोर तालुक्यातील एका गावात अवघे दोन वर्ष वय असलेल्या बालिकेवर एका नराधम अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुरडी अल्पवयीन आरोपीच्या शेजारी राहत असून, त्यांची एकमेकांशी ओळख होती. आरोपी अल्पवयीन मुलाकडे पीडित चिमुरडी खेळण्यास येत असायची. लहान मुलीची आई कपडे धूत असताना अल्पवयीन आरोपीने चिमुरडीला त्याच्या खोलीत नेऊन आतून कडी लावून घेतली.त्यानंतर मुलीच्या रडण्याचा आवाजाने मुलीची आई बंद असलेल्या खोलीकडे धावत गेली. तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपीने दरवाजा उघडला नाही.

Advertisement

आरडाओरडा केल्यानंतर अल्पवयीन आरोपीने मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती राजगड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आपली चक्रे फिरवत आरोपीचा तात्काळ शोध घेत ताब्यात घेतले.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page