अल्पवयीन मुलीला धमकावत केला लैंगिक अत्याचार; बारामती तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस

बारामती : बारामतीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला धमकी देत एका तरुणाने अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Advertisement

अनिरुद्ध उर्फ दादा भालचंद्र त्रिकुंडे (रा. चंद्रमणीनगर, बारामती) असे आरोपीचे नाव असून पीडित मुलगी महाविद्यालयात गेल्यावर आरोपी तिच्या मागे जात होता. महाविद्यालय सुटल्यावर गेटवरूनच तो तिला कारमध्ये जबरदस्तीने बसवून निर्जनस्थळी नेत होता. तेथे तिला मारून टाकीन अशी धमकी देत कारमध्येच तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित करत होता. अशी तक्रार पीडित मुलीने पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page