विधीसंघर्षित बालकास लोखंडी हत्यारासह घेतले ताब्यात..!

मा. वरिष्ठांचे आदेशाने दि.२०/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी तसेच अंमलदार असे सिंहगड रोड पोलीस स्टेशन हाद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार तानाजी सागर, समीर माळवदकर यांना त्याचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम त्याने अंगात काळ्या रंगाचा शर्ट, निळसर रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली असुन तो तुकाईमाता रिक्षा स्टॅड जवळ कॅनल लगत वडगाव बु पुणे येथे लोखंडी हत्यार घेवुन थांबलेला आहे. सदरची बातमी लागलीच मा. वरिष्ठांना कळविल्याने त्यांनी बातमीची खात्री करुन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने, सदर कार्यवाही करणे कामी तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन पाहणी करता एक इसम हा तुकाईमाता रिक्षा स्टॉड चे जवळ कॅनल लगत थांबलेला दिसला तो पोलीसांना पाहुन पळुन जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यास स्टाफच्या मदतीने ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता तो विधीसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास सदर ठिकाणी थांबण्याचे कारण विचारले असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे देताना त्याचे शारीरीक हालचाली संशयास्पद वाटल्याने तो काहीतरी दखलपात्र गुन्ह्या करण्याच्या तयारीत असल्याची सर्व स्टापची खात्री झाल्याने त्याची दोन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेता त्याचे जवळ ३००/- रुपये किंमतीचे एक लोखंडी कोयता, तसेच त्याचे घरझडती मध्ये लोखंडी कोयते, दोन लोखंडी धारदार हत्यार, एक लोखंडी तलवार व एक चायनीज चॉपर हत्यार असा एकुण २६००/-रु किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले असुन त्याचे विरुध्द सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३, पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग श्री. अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन श्री. विनय पाटणकर पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. समीर गायकवाड यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार उत्तम तारु, आण्णा केकाण, विकास बांदल, सतिष मोरे, राहुल ओलेकर, सागर शेडगे, तानाजी सागर, संदिप कांबळे, समीर माळवदकर, विनायक मोहीते, शिरीष गावडे यांनी केली.




