हॉस्पीटलचे एमआरआय मशिनची कॉपर वायर चोरुन नेणा-या आरोपींना केले जेरबंद..!

दि.०६/०४/२०२६ रोजी येरवडा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.०७/२०२६ भा.न्या.सं.क ३०३ (३) प्रमाणे भारत डायग्नोस्टिक सेंटर, राजीव गांधी हॉस्पीटल, येरवडा, पुणे येथील एमआरआय मशिनची हिरव्या रंगाची कॉपर वायर कापुन चोरी केल्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता.

त्याअनुषगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री रविंद्र कदम यांचे मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलिस स्टेशनचे तपास पथकाने अज्ञात आरोपीताबाबत कोणतीही माहिती नसताना पोलीस अंमलदार भिमराव कांबळे व सुरज ओंबासे यांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज व इतर ठिकाणाच्या ५० सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पाहिजे आरोपी निष्पन्न करून ताडीगुत्ता, येरवडा, पुणे या ठिकाणी सापळा रचुन पाहिजे आरोपीताचा पाठलाग करुन आरोपी नामे १) दिनेश भगवान साळवे, वय २२ वर्षे, रा. यशवंतनगर, येरवडा, २) बद्रुजमान जिहाउल शेख, वय २४ वर्षे, रा. ताडीगुत्ता, येरवडा, पुणे ३) अब्राहिम नरेश यादव, वय २० वर्षे, रा. ताडीगुत्ता, येरवडा यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे अधिक चौकशी करुन आरोपी नामे ४) सचिन सुरेश गवळी ऊर्फ गोलडया, वय ३६ वर्षे, रा. ताडीगुत्ता, येरवडा यास ताब्यात घेवून त्यांचेकडुन ३५,०००/- रुपये किमतीची एकुण ३० मीटर लांबीची हिरव्या रंगाचे प्लास्टिक आवरण असलेली कॉपर वायर हस्तगत करण्यात आली आहे.

Advertisement

सदर कामगिरी मा. अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परीमंडळ -४, श्री चिलुमुला रजनिकांत, मा. सहा पोलिस आयुक्त, येरवडा विभाग श्री. सुनिल जैतापुरकर, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन श्री. रविंद्र कदम, सहा पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार, पोलीस उपनिरीक्षक संदिप जगताप, पोलीस अंमलदार शिंदे, कांबळे, ओंबासे, गायकवाड, शेख, परदेशी, जाधव व शिंदे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page