सरकारी कार्यालयात घुसून भरदिवसा तलाठ्याची हत्या; हिंगोलीतील घटनेनं खळबळ

हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तरुणाने तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. संतोष पवार (वय ३६) असे हत्या झालेल्या तलाठीचे नाव आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगावमध्ये ही घटना घडली.

Advertisement

तलाठी कार्यालयात प्रलंबित शेती कामानिमित्त आलेल्या एकाने तलाठ्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून चाकूहल्ला केला. शेतीचा फेरफार प्रलंबित असल्याच्या रागातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. यात गंभीर जखमी झालेल्या तलाठ्याचा परभणीकडे उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना बुधवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.

संपादक
-आरतीताई बाबर 8830914142
-उपसंपादक अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page