सराईत गुन्हेगाराकडुन एक पिस्टल व एक काडतुस केले हस्तगत..!

सदर बाबत अधिक माहिती अशी की, दि. ३०/०३/२०२६ रोजी किरण लिटे पोलीस उपनिरीक्षक, सहा पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे, पोलीस अंमलदार/८६०० चव्हाण, पोलीस अंमलदार/७३५ कोंडे, पोलीस अंमलदार/४७३५ चव्हाण, पोलीस अंमलदार ४२७६ भोरडे, असे न-हे पोलीस स्टेशनचे हद्दीत अवैध धंदे वर कारवाई करणे कामी तसेच आरोपी चेक करीत असताना पोलीस अंमलदार देवा चव्हाण व शाहु राठोड, यांना त्यांचे बातमीदारा कडुन बातमी मिळाली की, एक इसम मानस ग्राऊंड पुणे या ठिकाणी संशयरित्या फिरत असुन त्याचेकडे एक पिस्टल आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने आम्ही सदरची बातमी पोलीस उपनिरीक्षक, किरण लिटे यांना कळविली असता त्यांनी सदरची बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक न-हे पोलीस स्टेशन पुणे यांना कळविली असता मा. वरिष्ठांनी सदर बातमीची खात्री करुन योग्यती कायदेशिर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने मानस ग्राऊंड पुणे. येथे आलो असता, मिळाले बातमी प्रमाणे नमुद ठिकाणी जाता एक इसम सदर ठिकाणी संशयीतरित्या फिरत असताना दिसला त्यास आमची येण्याची चाहुल लागु न देता त्यास आहे त्या परिस्थितीत वरील स्टाफचे मदतीने जागीच १९.२० वा. पकडले असता तो इसम फार कावराबावरा झाल्याने व चुळबुळ करीत असल्याने तो काही तरी लपवित असल्याचा संशय आल्याने त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्या इसमाने त्याचे नाव अमोल पदमाकर सोळंके वय २४ वर्षे रा. फॅलट नंबर ५०१, आरोही सोसायटी, रायकर मळा, धायरी पुणे. सध्या फलॅट नंबर २०१, पार्वती हाईटस, स्वामी समर्थ कंपनी, (जाधवर इंडस्ट्रीज) नांदेडसीटी पोलीस स्टेशनच्या मागे. मुळगाव मुं.पो. आनंदगाव, ता. माजलगाव, जिल्हा, बीड असे असल्याचे सांगितले त्यावर पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर इसमाची पंचांसमक्ष झडती घेता त्याचे पोटाचे खाली मधोमध कमरेला एक लोखंडी पिस्टल व ०१ जिवंत राऊंड मिळुन आले. ती गुन्हयाचे पुरावे कामी जप्त केले असुन सदर इसमावरती गुन्हा रजी. नं. १२५/२०२६ आर्म अॅक्ट कलम ३,२५ महा.पो.अधि.३७,१,३ सह १३५ अन्वये गुन्हयाचा पुढील तपास किरण लिटे पोलीस उपनिरीक्षक न-हे पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहेत.

Advertisement

सदरची कामगिरी मा. श्री. अमितेश कुमार साो, पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा.श्री रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. राजेश बनसोडे, अप्पर पोलीस आयुक्त साो, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. संभाजी कदम सोो, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ -३, पुणे शहर श्री. अजय परमार सो, सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग पुणे शहर श्री. आसाराम शेटे साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक, किरण लिटे, पोलीस अंमलदार संजय शिंदे, निलेश भोरडे, देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोंडे, शाहु राठोड, कांतीलाल धोत्रे यांचे पथकाने केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page