खोट्या गुन्ह्याची भिती दाखवून ७ लाखांची खंडणी उकळणा-यांविरूध्द गुन्हा दाखल..!

एका नामंकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देवून ७ लाख रूपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी आणि दोन अंमलदार यांच्यावर कायदेशिर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जुलै २०२५ मध्ये एका विद्यार्थीनीने तिची मुळ कागदपत्रे परत मिळवण्यासाठी पोलीसांकडे धाव घेतली होती. नियमानुसार प्रक्रिया सुरू असताना, संबंधित तपास अधिकारी यांनी प्राचार्यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे खोटे आरोप केले. विद्यार्थीनी अल्पवयीन असल्याचे सांगुन प्राचार्यावर पोक्सो (POCSO) अंतर्गत कारवाई करण्याची आणि संस्थेची प्रतिमा मलिन करण्याची भिती दाखविण्यात आली. संस्थेची बदनामी टाळण्यासाठी आणि अटक टाळण्यासाठी संबंधितांनी १० लाख रुपयांची मागणी केली होती. अखेर तडजोडी अंती ७ लाख रुपये देण्याचे ठरले. दिनांक २८ जुलै २०२५ रोजी ही रक्कम कॉलेजमधील एका कर्मचा-यामार्फत संबंधीत आरोपींपर्यंत पोहोचविण्यात आली. घडलेल्या चुकीच्या प्रकाराबाबत न राहुन सदर पिडीत मुलीने आपल्या पालकांसोबत पोलीस आयुक्तालयात तक्रार केली. केलेल्या तक्रारीच्या चौकशीमध्ये हा प्रकार उघडकीस आला. पोलीस कर्मचारी यांनी तरुणीला घाबरवुन व संगनमत करुन हा बनाव रचला होता. खोटया गुन्ह्याचा धाक दाखवुन जाणीवपुर्वक ही खंडणी वसुल करण्यात आली. या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलीस उप निरीक्षक अजित बडे, पोलीस अंमलदार सुदाम तायडे व महिला पोलीस अंमलदार सोनाली हिंगे यांचेवर बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.८७/२०२६ भा.न्या.सं.क. ३०८(२), ३०८ (६),६१ (२), व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Advertisement

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १ श्री. शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, पोलीस निरीक्षक, आश्विनी जगताप, गुन्हे शाखा, युनिट २ व पोलीस अंमलदार गणेश ढगे, साधना पवार, महेश पाटील, अमित गद्रे, शंकर नेवसे, सर्व नेमुणक गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page