अपहरण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन फरार असलेल्या दोन आरोपीतांना केले जेरंबद..!

अहिल्यानगर येथे श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.र.नं २९४/२०२६ भा. न्या. संक ३०८ (५),३२४,४(५), ३५२, ३५१ (२),५ (५) अन्वये जीवे ठार मारण्याचे उददेशाने अपहरण केले बाबत गुन्हा दाखल झाला होता व गेले एक महिन्यापासून आरोपी फरारी झाले आहेत. सदर आरोपीतांवर अहिल्यानगर श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे शरिराविरुध्द व मालमत्तविरुध्द २० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असून सदरचे आरोपी हे पुणे येथे आपले अस्तिव लपवून बसले आहेत व ते सध्या एस टी स्टॅण्ड शिवाजीनगर, पुणे येथे फिरत आहेत अशी गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांना बातमी मिळाली.
दिनांक ०८/०४/२०२६ रोजी मिळालेल्या बातमी प्रमाणे युनिट २ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप व पोलीस अंमलदार यांनी शिवाजीनगर एस टी स्टॅण्ड येथे सापळा लावून गुन्हयातील आरोपी नामे १) साई संजय मदने वय २३ वर्ष रा. काष्ट्री ता. श्रीगोंदा जि अहिल्यानगर २) वैभव सुभाष चौधरी वय २६ वर्ष रा दौड गजानन सोसायटी पॅलट क्रमांक २१ जि पुणे यांना शिताफिने ताब्यात घेतले. सदर आरोपीतांना पुढील कारवाई कामी श्रीगोंदा पोलीस स्टेशन अधिकारी व अंमलदार यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप पोलीस अंमलदार संजय जाधव, उज्वल मोकाशी, विजयकुमार पवार, नागनाथ राख व साधना ताम्हाणे विनोद चव्हाण, शंकर कुंभार, शिवानंद कायगुडे, ओकांर कुंभार विशाल दळवी, रुषिकेश व्यवहारे संतोष टकले, सर्जेराव सरगर, संजय आबनावे, संदिप शिर्के, शंकर नेवसे, अजीम शेख सददाम तांबोळी व विनायक वगारे यांनी केली आहे.




