सराईत आरोपीकडुन घातपाताचा कट उधाळला, सदर आरोपीकडुन एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत राउंड जप्त..!

दिनांक २३/०३/२०२६ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप- निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार हे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे व अभिनय चौधरी यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराव्दारे बातमी मिळाली की, कात्रज, गंधर्व लान्सचे पुढील समोरील रतन मोटर्सजवळील कात्रज घाटाकडे जाणा-या रोडवर एक इसम अग्नीशस्त्र घेवुन वावरत आहे. सदरची माहिती मिळताच तात्काळ पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व नमुद अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन बातमी प्रमाणे इसमाचा शोध घेतला असता इसम नामे लक्ष्मण दगडु कचरे वय २२ वर्षे, रा. जैन मंदीराजवळ, सच्चाईमाता, पाण्याचे टाकीजवळ, कात्रज, पुणे हा त्याचे ताब्यात ५०,०००/- रु.किं. चे एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत राउंड सहीत मिळुन आला. त्याचेकडुन गावठी बनावटीचा कट्टा व जिवंत राउंड जप्त करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं ११०/२०२६, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरी. पाटील हे करीत आहेत.

Advertisement

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २ पुणे शहर श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, व संदीप आगळे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page