व्यापा-याचे अपहरण करणा-या ५ आरोपींना ठोकल्या बेडया, २४ तासाच्या आत व्यापा-याची केली सुखरुप सुटका गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी..!

दिनांक २४/०३/२०२६ रोजी गुलटेकडी येथे राहणारे व्यापारी यांचे टिंबर मार्केट येथुन काही इसमांनी आर्थिक व्यवहारातुन अपहरण करुन त्यांचे पत्नीला ०१ कोटी ५० लाख रुपयाची खंडणी मागीतली होती. त्यावरुन स्वारगेट पो.स्टे. गु.र.नं. ६०/२०२६ भा.न्या.सं.क. १४०(२), ३ (५) प्रमाणे दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा करीत असताना अपहरण करणा-या आरोपीतांनी सदरची रक्कम मित्र मंडळ चौक स्वारगेट येथे आणुन देण्यास सांगितल्याने सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन वरिष्ठांच्या सुचनांनुसार गुन्हे शाखेच्या दोन टिम तयार करण्यात आल्या. एक टिम सदरची रक्कम घेवुन मित्र मंडळ चौक येथे आरोपींची वाट पाहत असताना तेथे दोन इसम सदरची रक्कम घेण्यास आले असता त्यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचेकडे त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) प्रणव बबन निवंगुणे वय २३ वर्षे, रा.स.नं.३२/१०, गणेश हौसिंग सोसायटी, घर नं.२४५, आंबेगाव पठार पुणे. २) साहिल श्रीकांत खुटवड वय २१ वर्षे, रा, घर नं.३२, गल्ली नं.४ काशिदनगर भिलारेवाडी कात्रज पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांनी सांगितले की, सदर व्यापा-याचे अपहरण इसम नामे ३) सौरव विश्वनाथ पवार वय २७ वर्षे, रा, सागर सोसायटी, बावधन खुर्द पुणे. ४) शिरीष जितेंद्र खोपडे वय २६ वर्षे, रा.३२/१०, आंबेगाव पठार, श्री गणेश निवास, कात्रज पुणे. ५) मंदार श्रीधर दारवटकर वय ३० वर्षे, रा, म्हसोबा मंदिर राजवर्धन हाईट्स वडगाव बुदुक सिंहगडरोड पुणे यांनी केले असुन त्यांना सिल्व्हर रंगाचे इटीयोस कार क्र.एम.एच.१२ जे.एम. २३२१ मधुन खेड शिवापुर येथे नेले असल्याचे सांगितले असता लागलीच रवाना होवुन अपहृत व्यापा-याची सुखरुप सुटका करुन इतर तिन आरोपीतांना ताब्यात घेवुन स्वारगेट पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील अधिक तपास स्वारगेट पोलीस स्टेशन हे करीत आहे. नमुद आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर पुणे शहर व पुणे ग्रामीण येथे गुन्हे दाखल आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे ०२ पुणे शहर श्री. राजेंद्र मुळीक, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे १, पुणे शहर श्री. शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राजमाने पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक ०२, श्री. काईंगडे पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक ०१, श्री. प्रशांत अन्नछत्रे पोलीस निरीक्षक युनिट ०३, श्री. अजित जाधव पोलीस निरीक्षक युनिट ०१, सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ युनिट ०२ तसेच युनिट ०१ व ०२, खंडणी विरोधी पथक ०१ व ०२ कडील पोलीस अंमलदार यांनी केली.




