बनावट तिकिटाद्वारे विमानतून जाण्याचा प्रयत्न फसला; पुणे एअरपोर्टवरून दोघांना अटक

पुणे : पुणे विमानतळावर आज बनावट तिकीटांच्या माध्यमातून इंडिगो च्या विमानाने उड्डाण करण्याचा डाव पोलिसांनी उधळला आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये दोघांना अटक केली आहे. सलीम खान आणि नसरुद्दीन खान अशी संशयितांची नावं आहेत. बनावट तिकीटांच्या माध्यमातून ते इंडिगो च्या विमानाने लखनऊला जाण्याचा प्रयत्न करत होते.
Advertisement
दोघेजन विमानात चढण्याचा प्रयत्न करताना एअरपोर्ट विभागाला तिकिटे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांचे दहशतवादी कनेक्शन आहे का? याबाबत तपास सुरु केला आहे. मात्र यामुळे पुणे विमानतळावर एकच उडाली आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर
Advertisement




