अल्पवयीन निर्भयावर लैगिंक अत्याचार करणा-या आरोपीस मा. न्यायालयाने सुनावली २० वर्षे सक्त मजुरी व १०,०००/- रू. दंडाची शिक्षा..!

दि.२७/०८/२०२० रोजी राजीव गांधी कॉलनी तरवडे वस्ती महमंदवाडी हडपसर पुणे येथे एका अल्पवयीन निर्भया हिचेवर लैगिंक अत्याचार केलेबाबत वानवडी पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं. ८०१/२०२० भादंविसं क. ३७६,३७६ (a) (ड), पोक्सो ३ (ड़) (d), ४,५ (m),६,७,८,११ (१) (३), १२ प्रमाणे आरोपी नामे कुंडलीक गुलाबराव जाधव वय-४०वर्षे, रा. महमंदवाडी हडपसर पुणे याचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Advertisement

सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित जोगदंड यांनी व त्यानंतर संदिप वरपडे यांनी पुर्ण करून आरोपी विरुध्द मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सदर प्रकरणी मे. श्री. एम. के. महाजन साो, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश पुणे यांचे न्यायालयात न्यायालयीन कामकाजावेळी सरकारी अभियोक्ता श्री. मिलींद डी दातरंगे साो, यांनी सरकारी पक्षातर्फे निर्भयाची कायदेशिर बाजू मांडली. तसेच मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-५ पुणे, श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे श्रीमती नम्रता देसाई, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पोलीस स्टेशन पुणे श्री. भाऊसाहेब पाटील, यांचे मार्गदर्शन सुचनाप्रमाणे कोर्ट पैरवी अंमलदार पोलीस अंमलदार दिनेश जाधव यांनी गुन्हयातील साक्षीदार तसेच पुरावे मा. न्यायालयात सादर केले. सदर प्रकरणामध्ये मे. श्री. एम. के. महाजन साो, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश पुणे यांनी आरोपी कुंडलीक गुलाबराव जाधव वय-४० वर्षे, रा. महमंदवाडी हडपसर पुणे यास पोक्सो ५ (m), ६ मध्ये दोषी धरून २० वर्षे सक्त मजुरी व १०,०००/- रू. दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अधिक शिक्षा आणि पोक्सो ११ (२), (३), १२ खाली तीन वर्षे सक्त मजुरी व ५,०००/-रू. दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अधिकचा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

सदर गुन्हयाचे दोषसिध्दीचे कामकाज पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०५ पुणे शहर, श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर श्रीमती नम्रता देसाई, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भाऊसाहेब पाटील, व पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता जाधव, वानवडी पो. स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अंमलदार दिनेश जाधव यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page