पहिल्यांदाच दोन दिवाळी पाडवा, गोविंदबागेत शरद पवार, तर काटेवाडीत अजितदादांना भेटण्यासाठी समर्थकांची गर्दी

पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी राज्यभरातून लोक येत असतात. मात्र यंदा पहिल्यांदाच दोन दिवाळी पाडावा साजरा होत आहे. वाचा सविस्तर बातमी…
अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्ते काटेवाडीत
बारामती तालुक्यातील काटेवाडीमध्ये दिवाळीनिमित्त भेटीगाठींचा सोहळा आयोजित केला आहे. पाडव्याची सुरुवात ही काटेवाडीतच झाली आहे, असं म्हणत अजित पवार यांनी आपण काटेवाडीत पाडवा साजरा करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता आज अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्यांनी गर्दी केली आहे. अजित पवार त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार, जय पवार कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार करत आहेत. पाडव्याची सुरुवात काटेवाडीतूनच झाली. अजितदादा काम करणारा नेता आहे. त्यांना भेटण्यासाठी आल्याचं कार्यकर्त्याने सांगितलं.
शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी
पवारांना भेटण्यासाठी कार्यकऱ्यांनी गर्दी केली आहे. काहीही झालं तरी शरद पवार आमच्यासाठी सर्वकाही आहेत. त्यांना भेटण्यासाठी आम्ही आलो आहोत. वर्षानुवर्षे आम्ही त्यांना भेटायला येतो. गेली 18 वर्षे मी शरद पवारांना भेटण्यासाठी, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी येत असतो, असं एका कार्यकर्त्याने सांगितलं.
पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते यायचे. मात्र आता पहिल्यांदाच पवारांच्या बारामतीत दोन दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. शरद पवार आणि अजित पवार दोन वेगवेगळ्या ठिकाणी दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. गोविंदबागेत शरद पवारांना तर काटेवाडीत अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.
संपादक -आरतीताई बाबर -8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर -8625870039




