संविधान चौक, केदारी सर्कल, काकडे मैदानावरील अतिक्रमणे वानवडी पो. स्टे व पुणे महानगर पालिका, पुणे यांचे संयुक्त कार्यवाहीतून केले निष्कासित

दिनांक १२/०६/२०२६ रोजी सकाळी १०/०० वा ते १२.०० वा वानवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अतिक्रमण निष्कासन कार्यवाही राबविण्यात आली. वानवडी पोलीस स्टेशन हद्दीतील संविधान चौक, केदारी सर्कल, बालाजी डेअरी या परिसरात विविध व्यापारी यांनी अनाधिकृतपणे फुटपाथच्या बाजुला टप-
या व पत्र्याचे शेड बांधल्याने जेष्ठ नागरिक, महिला, तसेच बालके यांना मुक्त संचार करणेस अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांकडून वेळोवेळी तोंडी तक्रारी प्राप्त झाल्याने सदर तक्रारीचे अनुषंगाने वानवडी पोलीस स्टेशन तथा म.न.पा वाहतुक शाखा, एम.एस.सी.बी, फायरब्रिगेड यांनी संयुक्तपणे कारवाई आयोजित करुन कायदेशिर पद्धतीचा अवलंब करुन दरम्यान संविधानचौक, केदारी सर्कल, बालाजी डेअरी या परिसरातील अतिक्रमण कारवाई करून अनाधिकृत टपऱ्या व पत्र्याचे शेड निष्कासीत केले आहेत. सदरच्या संयुक्त कारवाई करिता म.न.पा अधिकारी व वानवडी पोलीस स्टेशन तथा वाहतुक शाखा, एम.एस.सी.बी, व फायरब्रिगेड यांचे एकुण अंदाजे १०० ते १२० अधिकारी व अंमलदार हजर होते. सदर कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. तसेच परिसरातील नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.
सदरची अतिक्रमण निष्कासन कारवाई ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर, श्रीमती नर्मता देसाई, सहा. पोलीस आयुक्त सोो, वानवडी विभाग, पुणे शहर, श्री. पंडीत रेजितवाड, वरिष्ठ पोलीसनिरीक्षक, वानवडी पो.स्टे. पुणे शहर, श्री. कैलास डाबेवार, पोलीसनिरिक्षक, गुन्हे, श्री. रंजीत मोहीते सपोनि. वाहतुक शाखा, तसेच म.न.पा बांधकाम विकास झोन क्रमांक ५ चे कार्यकारी अभियंता श्री. संतोष लांजेकर, उप अभियंता श्रीमती रूपाली ढगे, कनिष्ठ अभियंता सोपान रूपनवर, सहाय्यक अतिक्रमणनिरीक्षक श्री. रवि जाधव, फायरब्रिगेडचे अधिकारी श्री. विजय भिलारे, यांचे सहयोगाने सदरची अतिक्रमण निकासणाची कारवाई पार पाडण्यात आली.




