अनाधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशी ०४ महिला व ०१ पुरुष, यांना बुधवार पेठ, पुणे येथुन, पकडण्यात फरासखाना पोलीसांना यश..!

मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांनी अवैद्यरित्या बांगलादेशी महिला/पुरुष यांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने, मा. पोलीस उप-आयुक्त, झोन १, पुणे शहर, श्री. कृषिकेश रावले, यांचे गोपनीय बातमीवरुन, फरासखाना पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ प्रभारी अधिकारी श्री प्रशांत भस्मे, यांचे अधिपत्त्याखाली, सपोनि गायकवाड, पोउपनि शिंदे, पोउपनि जवळगी, व स्टाफ अशी एक टिम तयार करुन, बुधवार पेठ येथील रेडलाईट एरियामधील जनता बिल्डींग येथे बांगलादेशी महिला/पुरुष यांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन केल्यानंतर, फरासखाना पोलीस स्टेशन येथील प्रभारी श्री प्रशांत भस्मे याचे अधिपत्त्याखाली नेमण्यात आलेल्या टिमने जनता बिल्डींग, बुधवार पेठ पुणे येथे पंचासह रवाना होवुन छापा कारवाई दरम्यान ०४ बांगलादेशी महिला व ०१ पुरूष असे मिळुन आल्यानंतर, त्यांची सखोल चौकशी करण्यात आली असून पिडीत महिला यांना वेश्या व्यवसाय करुन घेण्यास भाग पाडणा-या आरोपीतांविरुध्द पिटा अंतर्गत फरासखाना पो.स्टे. गु.र.नं.७१/२०२६ भा.न्या.सं.क.१४३ (१), १४३ (३), ३ (५), पिटा अॅक्ट ३,४,५,६,७ तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Advertisement

आरोपी भुपसिंग श्रीमंगलसिंह राजपुत वय २८ वर्षे रा. बुधवार पेठ पुणे यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असून इतर आरोपीची माहिती काढून पुढील योग्य ती कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत भस्मे हे करत आहेत. मा. पोलीस उप-आयुक्त, झोन -१ पुणे शहर श्री. कृषिकेश रावले, यांनी पदभार स्विकारलेपासून आता पर्यंत अनधिकृतपणे भारतात राहणारे जवळपास ७० च्या आसपास बांग्लादेशी महिला व पुरूष यांना वेगवेगळ्या कारवाई द्वारे त्यांचे देशात पाठविण्याची प्रक्रिया केली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परि-१ पुणे श्री. कृषिकेश रावले, मा. सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग श्रीमती अनुजा देशमाने, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रशांत भस्मे, स.पो.नि. वैभव गायकवाड, पो.उप.नि. अरविंद शिंदे, पो.उप.नि. चंद्रकांत जवळगी, सपोफौज खराडे, पोलीस अमंलदार, सुनिल मोरे, महेश राठोड, नितीन जाधव, गजानन सोनुने, नितीन तेलंगे, विशाल शिंदे, सुमित खुट्टे, चेतन होळकर, पुंडलिक जुबंड, महिला पोलीस अंमलदार राजश्री मोहिते, काळे, कुंडे, भोईटे, बेंद्रे यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page