वाहन चोरीच्या गुन्हयात एक आरोपी जेरबंद..!

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी तपास पथकाचे अधिकारी अंमलदार यांना वाहन चोराचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे हे वाहन चोरांचा शोध घेत असताना त्यांना आरोपी नामे कुणाल शिवाजी नलावडे, वय २६ वर्षे, रा. फ्लॅट नंबर १, श्रीराम अपार्टमेंन्ट, कॅनरा बँकेसमोर, बिबवेवाडी, पुणे हा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ८६/२०२६, भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२) या गुन्हयातील चोरीस गेली ६०,०००/- रुपये किंमतीची होंडा कंपनीची अॅक्टीव्हा दुचाकी गाडी तिचा नंबर MH12QB0034 हिच्यासह मिळुन आल्याने त्याचेकडुन सदरची दुचाकी गाडी जप्त करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

Advertisement

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, श्री राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार व संदीप आगळे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page