कोणतेही धागेदोरे व तांत्रीक पुरावा नसताना बेवारस महिलेच्या खुनाचे गुढ उकलेले..!

दि. ०३/०३/२०२६ रोजी हडपसर-सासवड रोड लगत दिवे घट पायथ्याशी काची कंपनी शेजारील मोकळया जागेत वडकी या ठिकाणी एका ३० ते ४० वर्षे वयोगटातील अनोळखी महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह मिळुन आलेला होता. त्या सबंधाने फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्हयाचा मा. वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाखाली गुन्हयामधील अज्ञात आरोपींचा गुन्हे शाखा युनिट ६ पथकाडुन शोध सुरु असताना पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांचे सुचनाप्रमाणे अज्ञात आरोपीचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार अमित कांबळे व तानाजी देशमुख यांच्यासह युनिट ६ कडील पोलीस स्टाफने नमुद गुन्हयाचा बारकाईने तपास करुन एका सी.सी.टी.व्ही.फुटेजच्या आधारे गुन्हयाचा उलगडा करुन आरोपी नामे प्रकाश बिभीषन माने, वय २९ वर्षे, रा. समीर आंबेकर यांच्याकडे भाडयाने, वडकी नाला, ता. हवेली जि पुणे. यास ताब्यात घेवुन त्यास सखोल विचारपुस केली असता, आरोपीने मयत महिलेसोबत जबरदस्तीने शरीरसंबध करण्याच्या प्रयत्न केला असता मयत महिलेने प्रतिकार केल्याने त्याचा राग मनात ठेवुन आरोपीने मयत महिलेचा गळा दाबुन, डोक्यात दगड घालुन खुन केला आहे.

Advertisement

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ६ गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांचे सुचनांप्रमाणे पोलीस अंमलदार तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, प्रशांत कर्णवर, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, गणेश माने, शेखर काटे, नानासाहेब मोरे व अनिल जामगे तसेच महिला पोलीस अंमलदार पल्लवी मोरे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page