जाळपोळ करणा-या पाहिजे आरोपीस ताब्यात घेवुन ०९ घरफोडीचे व ०५ रिक्षा चोरीचे गुन्हे उघडकीस

दि.१८/०५/२०२६ रोजी संविधान सोसायटी, म्हाडा कॉलनी हडपसर, पुणे विधी संघर्षीत बालकाने त्याचे साथिदारांसह पार्किंगमधील दुचाकी वाहने जाळल्याने त्याबाबत फिर्यादी यांचे फिर्यादीवरुन वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २२४/२०२६ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३२४ (१), ३२४ (५),३२६ (फ), ३ (५) या कलमान्वये गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ५, पुणे शहर श्री. संदीपान पवार, यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे गुन्हे शाखा युनिट ५ पथक दाखल गुन्हयामधील विधी संघर्षीत बालक व अनोळखी आरोपींचा शोध घेत होते.
दि.२०/०५/२०२६ रोजी गुन्हयाचा समांतर तपास करुन आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार विनोद शिवले व सुधीर सोनवणे यांना मिळालेल्या बातमीवरुन दाखल गुन्हा हा आरोपी नामे. सोन्या ऊर्फ आयुष रविंद्र काळे, वय.२४ वर्षे, रा. इकबाल स्क्रैप सेंटरचे समोर फुटपाथवर, हिराबाग चौक, घोरपडे पेठ पुणे याने केला असल्याचे माहिती मिळाल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे तपास करुन त्याने व त्याचे साथिदारांनी वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २२८/२०२६ भारतीय न्यास संहीता सन २०२३ चे कलम ३०५,३२४(४),३३१ (४) हा घरफोडीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न करुन त्याने व त्याचे इतर साथिदारांनी वानवडी पोलीस स्टेशन कडील रिक्षा चोरीचे ०२ व घरफोडीचे ०२ गुन्हे, काळेपडळ पोलीस स्टेशन कडील ०१ रिक्षा चोरीचा गुन्हा, कोंढवा बुा येवलेवाडी पोलीस स्टेशन कडील ०१ घरफोडीचा गुन्हा, लष्कर पोलीस स्टेशन कडील ०१ घरफोडीचा गुन्हा, खडक पोलीस स्टेशन कडील ०१ रिक्षा चोरीचा गुन्हा, विश्रामबाग पोलीस स्टेशन कडील ०२ घरफोडीचे गुन्हे, अलंकार पोलीस स्टेशन कडील ०१ घरफोडीचा गुन्हा, सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील ०१ घरफोडीचा गुन्हा, पर्वती पोलीस स्टेशन कडील ०१ वाहन चोरीचा गुन्हा व सहकारनगर पोलीस स्टेशन कडील ०१ घरफोडीचा गुन्हा याप्रमाणे ०५ रिक्षाचोरी व ०९ घरफोडीचे असे एकुण १४ गुन्हे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. दत्तात्रय दराडे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. हसन गौहर, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. संदीपान पवार, गुन्हे शाखा युनिट ०५, पोलीस उप निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार विनोद शिवले, सुधीर सोनवणे, नेत्रिका अडसुळ, नासिर देशमुख, शहाजी काळे, प्रताप गायकवाड, शशिकांत नाळे, अमर चव्हाण, अकबर शेख, जयदेव भोसले, अविनाश इंगळे, राहुल ढमढेरे, परमेश्वर कदम, मयुरी पालवे यांचे पथकाने केली.




