टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; पुण्यातील घटना

पुणे : भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उत्तमनगर परिसरात घडली. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यश सुरेश तनपूरे (वय २१, रा. उत्तमनगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत यशचा मित्र निखिल वानखेडे (वय २०, रा. उत्तमनगर) याने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, पिकअप टेम्पोवरील चालकावर गुन्हा नोंदवला आहे.
दुचाकीस्वार यश आणि निखिल सोमवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास महाविद्यालयात निघाले होते. उत्तमनगर परिसरात भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार यश गंभीर जखमी झाला. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता टेम्पोचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या यशला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तो मरण पावला होता. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पोचालकाचा शोध घेण्यात येत आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




