बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एनकाऊंटरमध्ये मृत्यू; नेमकं काय घडलं?

बदलापूर: बदलापूरमधील शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. 2 चिमुरड्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जीपमधून नेत असताना अक्षयने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावली आणि पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला. या गोळीबारामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या गोळीबारामध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की आरोपीने पोलिसांच्या टीमवर फायरिंग केल्यानंतर आरोपीवरही प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला होता. यात अक्षयला गोळी लागली होती. जखमी होताच त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
ठाण्यातील बदलापूर येथे १२ आणि १३ ऑगस्टला एका शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदेवर दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. पीडित मुलींनी जेव्हा आई-वडिलांना याबाबत सांगितले. त्यानंतर ही घटना समोर आली होती. यानंतर बदलापूरमध्ये जोरदार तणाव निर्माण झाला होता.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




