मौजमजा करण्यासाठी दुचाकीचोरी करणारी पुणे शहरातील टोळी जेरबंद..!

फिर्यादी यांनी दिनांक १८/०२/२०२६ ते दिनांक १९/०२/२०२६ रोजीचे सकाळी ०९.०० वा. चे दरम्यान भिकोबा मोरेनगर, मोरे रेसीडेन्सी, प्लॅट नंबर ४०४, कवडे हॉस्पीटल समोर, उत्तमनगर पुणे येथील त्यांनी घराचे पार्कंग मधुन निळया व पांढरे रंगाची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्रो दुचाकी, क्रमांक एम.एच.१२.एच.एम. ३१२६, तिचा इंजिन क्रमांक- HA10EGBHJ ३८६४९, तिचा चेसी क्र. MBLHA10AABHJO ५८६९ वर्णनाची व ५०,०००/-रूपये किंमतीची दुचाकी ही कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली म्हणुन अज्ञात इसमाविरूध्द उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंद करणेत आलेला आहे. नमुद गुन्हा लवकरात लवकर उघडकिस आणण्याचे दृष्टीने उत्तमनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांनी तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन केले होते.मा. वरिष्ठांनी पुणे शहरात ट्रिपल सीट तसेच मॉडीफाईड सायलेन्सर वापरुन वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाया वाहनांवर कारवाई करण्याबाबतचे आदेश दिलेले होते. सदरील आदेशाचे अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राघवेंद्रसिंह क्षिरसागर यांचे उपस्थितीत उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी सुरु असताना नाकाबंदी दरम्यान विना नंबरप्लेट गाडी वापरणारा विधीसंघर्षित बालक यास थांबवुन त्याचे ताब्यातील वाहनाबाबत अधिक चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांस ताब्यात घेवुन कसुन चौकशी केली असता त्याने सदरील दुचाकी गाडी चोरी केल्याची कबुली दिली नमुद दुचाकी वाहनाबाबत आर.टी.ओ अॅप वरुन माहिती घेतली असता सदरील दुचाकी उत्तमनगर पोलीस ठाणे.गु.र.नं १७/२०२६ मधील असल्याची माहिती प्राप्त झाली. उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद असल्याने नमुद दुचाकी ताब्यात घेण्यात आली व एका विधीसंघर्षित बालक याचेकडे कसुन तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार नामे १. महेश हनुमानसिंग राजपुत वय २३ वर्षे रा. – एनडीए पोलीस चौकी मागे, उत्तमनगर पुणे व त्याचा मित्र यांचे सोबत केल्याचे सांगितले. दाखल गुन्हयातील पाहीजे आरोपी यांचा तांत्रिक तपासाद्वार शोध घेतला असता पाहीजे आरोपी नामे महेश हनुमानसिंग राजपुत वय २३ वर्षे रा.एनडीए पोलीस चौकी मागे, उत्तमनगर पुणे यास दिनांक २६/०२/२०२६ रोजी सिंहगड सुष्टी, खडकवासला पुणे येथुन स्प्लेंडर प्लस वाहनासह ताब्यात घेवुन त्याचेकडे असणा-या एम.एच २४ बी.पी२७९० स्प्लेंडर प्लस या वाहनाबाबत चौकशी केली असता त्याने सदरील दुचाकी चोरीची असल्याचे सांगुन तिची नंबर प्लेट बनावट असल्याच सांगितले. तपासाद्वारे सदरील दुचाकीच्यामुळ मालकाचा शोध घेतला असता सदरचे वाहनाचा मुळ नंबर हा एमएच १२ युयु ५८०१ हा असुन सदर दुचाकी चोरी बाबत कोथरुड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद असल्याची माहिती प्राप्त झाली. आरोपी महेश रजपुत यास विश्वासात घेवुन कसुन तपास केला असता त्याने त्याचा साथीदार यांनी एकत्र मिळुन पुणे शहर व पिंपरीचिंचवड परिसरात सन २०२४ ते दिनांक १९/०२/२०२६ रोजी पर्यंत दुचाकी चोरी केलेची कबुली दिल्याने गुन्हयाचे तपासात पुणे शहर पोलीस आयुक्तालय तसेच पिंपरीचिंचवड आयुक्तालयातील व पुणे ग्रामीण हद्दीतील एकुण १४ गुन्हे उघडकीस आलेले असुन. अटक आरोपीकडुन एकुण २० मोटारसायकल (एकुण १५,००,०००/- रूपयांचा) मुदेमाल जप्त करणेत आलेला आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page