अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन, २४ तासात गुन्हा उघडकीस करून आरोपीस केले जेरबंद..!

चंदननगर पोलीस स्टेशन गु. र. नं. २५३/२०२५, भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) या गुन्हयातील फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी नामे निर्भया वय १३ वर्षे ०८ महिने हिस दिनांक ०५/०७/२०२५ रोजी राहते घरापासुन कोणीतरी फिर्यादी यांचे कायदेशीर रखवाली मधुन फुस लावुन पळवुन घेऊन गेले बाबत दिलेल्या तक्रारी वरुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याचा तपास पोलीस उप-निरीक्षक सचिन राऊत, चंदननगर पो.स्टे. पुणे यांच्याकडे देण्यात आला होता.
सदर गुन्हयातील पिडीत मुलगी व आरोपी यांचा शोध घेणेकरीता सी.सी.टी.व्हि. फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या अधारे केले तपास मध्ये अपहरण मुलगी व तीला पळवुन घेऊन जाणारा आरोपी हे अहिल्यानगर भागात असल्याचे निष्पन्न झाल्याने, सदर ठिकाणी तात्काळ तपासकामी पोलीस उप- निरीक्षक सचिन राऊत व म. पोलीस अंमलदार देवकाते यांना पाठविले असता त्यांनी यातील पिडील मुलगी व तीला पळवुन घेऊन जाणारा आरोपी नामे, अभिषेक विजय जाधव वय २२ वर्षे रा. लेन नं-३, गणेश नगर वडगांवशेरी पुणे (मुळ गाव- पाथर्डी जि. अहिल्यानगर) यांना अहिल्यानगर येथुन ताब्यात घेऊन, आरोपीस अटक करण्यात आलेली असुन त्यास आज दि.०६/०७/२०२५ रोजी मा. न्यायालयामध्ये हजर ठेवण्यात आलेले आहे. दाखल गुन्हा घडलेपासुन २४ तासाचे आत आरोपीस अटक करुन, पिडीत मुलीची सुखरुप सुटका करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप-आयुक्त, परि ४ पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली चंदननगर पो.स्टे.पुणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सीमा ढाकणे, तपासी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक सचिन राऊत, म. पोलीस अंमलदार देवकाते यांनी केली आहे.




