फुरसुंगी पोलीसांनी तडीपार आरोपीस ठोकल्या बेडया..!

आरोपी नामे दत्ता रामभाऊ होळकर, रा. होळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे यास मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर यांनी त्यांचेकडील तडीपार आदेश क्र. ८०/२०२४, दिनांक १६/११/२०२४ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परिक्षेत्र व पुणे जिल्हा कार्यक्षेत्राचे हद्दीतून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. आरोपीविरुध्द गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून धोकादायक आहे. दि.१७/०२/२०२६ रोजी तपास पथक फुरसुंगी पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रामध्ये पाहिजे आरोपी, तडीपार आरोपी शोध, अवैद्य धंदे तसेच गुन्हे प्रतिबंध करण्याकरीता मा. वरिष्ठांचे आदेशाने पेट्रोलिंग करत होते. पोलीस पथकातील पो. अंमलदार अभिजित टिळेकर यांना गोपनिय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, तडीपार आरोपी दत्ता होळकर हा महादेव मंदिरासमोर, होळकरवाडी, पुणे येथे आला आहे. अशी खात्रीलायक बातमीचे आधारे वरिष्ठांकडून प्राप्त सुचनेप्रमाणे त्यास सापळा लावून ताब्यात घेत असताना तो पोलीसांची चाहूल लागल्याने पळून जाण्याचे तयारीत होता. पोलीस पथकाने त्यास शिताफीने पकडून ताब्यात घेतले आहे. त्याचेकडे वरील ठिकाणी येण्याचे कारण तसेच परवानगीबाबत चौकशी केली असता त्याचेकडे कोणतही परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले. आरोपी नामे दत्ता रामभाऊ होळकर याने त्याचेविरुध्द लागू असलेल्या आदेशाचा भंग करून होळकरवाडी, जि. पुणे येथे मिळून आला असल्याने फुरसुंगी पोलीस स्टेशन गु.र.नं. ५८/२०२६, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

सदरची कामगिरी मा. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपआयुक्त परि.-६, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहा. पोलीस आयुक्त, लोणीकाळभोर विभाग पुणे शहर, श्री. अमोल मोरे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे सुचनेप्रमाणे पोलीस हवालदार नितीन गायकवाड, सागर वणवे, हरिदास कदम, श्रीनाथ जाधव, पोलीस अंमलदार हेमंत कामथे, अभिजित टिळेकर सर्व नेमणुक फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

वरील गुन्हयाचा तपास श्री हरिदास कदम, पोलीस हवालदार, फुरसुंगी पोलीस स्टेशन पुणे शहर हे करत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page