पुणे पोलीसांची राजस्थानमध्ये रेड. अंमली पदार्थाची तस्करी करणारी अंतरराज्यीय टोळी उध्वस्त करत १ किलो ९६० ग्रॅम मेफॅड्रॉन (एम.डी) जप्त करुन एकुण रु. ४ कोटी, २७ लाख, ०९ हजार/- मुद्देमाल हस्तगत करत ०६ आरोपींना केली अटक..!

दि.०३/०२/२०२६ रोजी रात्रौ ०४/३५ वा चे सुमारास ईहॉन फेज २ मागील गेट जवळ खराडी पुणे येथील सार्वजनिक रस्त्यावर दोन इसम एका पांढ-या रंगाचे स्वीप्ट कारमधुन२७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, व तत्सम साहित्य असे किं रु १२,४१,०००/- रुपये बेकायदेशीरपणे जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्यांच्याविरुध्द खराडी पोलीस स्टेशन, गुन्हा रजि क्र. २१/२०२६, कलम ८ (क), २१ (ब), २९ एनडीपीएस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
नमुद गुन्हयाचे तपासादरम्यान मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ७, पुणे शहर श्री. सोमय मुंडे, यांनी सदर गुन्हयाचे घटनास्थळी भेट देउन सदर गुन्हयातील जप्त मुददेमाल मेफॅड्रॉन या अंमली पदार्थाचे मुख्य रॅकेटचे जाळे उघड करण्याबाबत मार्गदशनकरुन सुचना दिल्या होत्या. त्यानुसार खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री संजय चव्हाण, यांनी तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक, श्री. रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक श्री राहुल कोळपे व तपास पथकातील स्टाफ यांची दोन तपासी पथके तयार करुन त्यांना सदर अंमली पदार्थाशी निगडीत इसमांचा तात्काळ शोध घेवुन गुन्हयाचा तपास शिघ्र गतीने करुन जास्तीत जास्त मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सुचना दिल्या.
गुन्हयाच्या तपासामध्ये दि ०३/०२/२०२६ रोजी अटक करण्यात आलेले दोन आरोपी इसम नामे मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित, वय २८ वर्षे, रा. वाघोली, पुणे व इसम नामे हरीष सुजनाराम देवासी, वय २२ वर्षे, रा. वाघोली पुणे या दोन्ही आरोपींकडे पोलीस कोठडीत कौशल्यपुर्ण तपास केला असता दोन्ही आरोपी हे जिल्हा जोधपुर, राज्य राजस्थान येथील मुळचे रहिवासी असल्याचे निदर्शनास आले व ते दोघेजण एमडी व्यवसायात गेल्या वर्षभरापासुन सक्रिय असुन एमडी हा अंमली पदार्थ ते राजस्थान येथील इसमांकडुन मागणीकरुन त्यांचे संपर्कात राहुन अंमली पदार्थाचा पुणे परिसरात व्यवसाय करीत असल्याचे तपासात उघड झाले.
पोलीस कोठडीत दिनांक ०७/०२/२०२६ रोजी आरोपी मोतीसिंह राजपुरोहित याचेकडे केलेल्या तपासात इसम योगेश ऊर्फ मनीष बाबुराम बिष्णोई, हा राजस्थान येथुन एमडी हा अंमली पदार्थ त्यास विक्री करण्यास येणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री संजय चव्हाण, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक, श्री रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक श्री राहुल कोळपे व तपास पथक अंमलदार पोलीस अंमलदार श्री श्रीकांत शेंडे, श्री महेश नाणेकर, श्री सचिन पाटील, श्री श्रीकांत कोद्रे, तांत्रिक विश्लेषक श्री सुरज जाधव यांनी सदर इसमास दि. ०७/०२/२०२६ रोजी वाघोली परिसरातुन सापळा रचुन ताब्यात घेवुन
त्याचेकडुन पंचनाम्या अंतर्गत एकुण १५१ ग्रॅम, किं.रु.३०,२०,०००/- चे मेफॅड्रॉन, १ मोबाईल कि.रु.८०००/- अशी एकुण ३०,२८,०००/- एवढा मुददेमाल हस्तगत केला व सदर एम डी विक्री करण्यास राजस्थान येथुन येणारा इसम योगेश ऊर्फ मनीष बाबुराम बिष्णोई, वय-३० वर्षे, रा- लोडता हरीदास शोता, कल्याणीनगर, लोहावत, तहसील-चामु, जिल्हा-जोधपुर, राज्य-राजस्थान यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. सदर इसमाकडे अधिक तपास केला असता, त्याचे सोबत राजस्थान येथुन पुणे परिसरात अंमली पदार्थाची विक्री करण्यास येणारा त्याचा मावस भाउ इसम सचिन ऊर्फ एस के रमेशकुमार बिष्णोई, वय २० वर्षे रा पल्ली खिलोरीता. लोहावट, जि जोतपुर राज्य, राजस्थान यास तपास पथकातील वर नमुद अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक तपास करुन त्यास हडपसर, मुंढवा परिसरातुन रात्रीच्या वेळी ताब्यात घेवुन त्याचेकडुन एम डी पदार्थ विक्री करुन जवळ बाळगलेली रोख रक्कम रु. ४,६५,०००/-, एक अॅपल मोबाईल फोन किं. ४०,०००/- अशी एकुण एवढी रक्कम हस्तगत करण्यात आली. सदर इसमास ताब्यात घेवुन त्याने पुणे परिसरात मांजरी बुदुक येथे राहणारा इसम अमित सुनिल घुले वय ४० वर्षे यास एम डी या अंमली पदार्थविक्री केल्याची कबुली दिल्याने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी इसम अमित सुनिल घुले वय ४० वर्षे, रा वृंदावन कॉलनी, बेल्हेकर वस्ती, मांजरी बु, पुणे यास त्याचे ताब्यातील फॉर्च्यूनर वाहनास मांजरी बुद्रुक, पुणे यास वरील पथकाने शिताफीने ताब्यात घेवुन त्यास त्याचे फॉर्च्यूनर वाहनासह एकुण ३९८ ग्रॅम एम डी, किं.रु. ७९,६०,०००/-, दोन मोबाईल फोन अशी एकुण ०१,०२,४०,०००/- एवढी मालमत्ता पंचनाम्याने जप्त करुन आरोपीस अटक करण्यात आली. दाखल गुन्हयाचे तपासामध्ये मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमितेश कुमार, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ७, पुणे श्री सोमय मुंडे, शहर व मा पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर श्री निखील पिंगळे, यांनी संपुर्ण गुन्हयाचा आढावा घेऊन राजस्थान येथील अंमली पदार्थाचे व्यवसायामध्ये सक्रीय असणा- या टोळीचे रॅकेट उध्वस्त करण्याबाबत मार्गदर्शन करुन त्यांचे मार्गदर्शना खाली तपास पथके तयार करुन श्री संजय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पोलीस स्टेशन यांना तपासाबाबत सुचना दिल्या. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक, श्री पंडीत रेजितवाड, अंमली पदार्थविरोधी पथक, युनिट २, पुणे शहर यांचे अधिपत्याखाली खराडी, वाघोली, विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक राहुल कोळपे, मनोज बागल, नितीन राठोड व पोलीस पथक, व अंमली पदार्थविरोधी पथक शाखा २ चे सहायक पोलीस निरीक्षक श्री नितीन कुमार नाईक असे एकुण ०५ अधिकारी व २० अंमलदार यांचे वेगवेगळी ५ तपासी पथके तयार करुन सुचना देऊन दि. ०९/०२/२०२६ रोजी सर्व तपास पथके राजस्थान राज्य येथे रवाना करण्यात आली. नमुद तपास पथकामधील अधिकारी व अंमलदार असे राजस्थान येथे दोन आरोपी यांचेसोबत जाऊन तपास करुन आरोपींची घरझडती घेतली व सदर आरोपीतांकडे कौशल्यपुर्ण तपास करुन अटक आरोपींच्या संपर्कातील एमडी अंमली पदार्थ मुख्य वितरक इसम रतनलाल किष्णाराम जाठ, वय २० वर्षे रा बलदेवनगर, बालोतरा, मुळ गांव पिरानी साई योकीढानी, परेड तहसिल – गिडा, जिल्हा बालोतरा यास दि. ११/०२/२०२६ रोजी ताब्यात घेवुन त्यास नमुद गुन्हयात अटक त्याचेकडुन एकुण १३८४ ग्रॅम, मेफॅड्रॉन हा अंमली पदार्थ किं.रु. २,७६,८०,०००/- (दोन कोटी शहात्तर लाख ऐंशी हजार रुपये) ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
तसेच राजस्थान येथे तपासा दरम्यान अंमली पदार्थाच्या रॅकेटमध्ये सक्रिय असणारा व पुणे शहरातुन फरार असणारा आरोपी रामकरण जाट ऊर्फ चौधरी ऊर्फ सियाग, रा कपोरीया ओसीया, जिल्हा जोधपुर यास श्री पंडीत रेजितवाड, प्रभारी पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थविरोधी पथक २, पुणे, व त्यांचे पथक यांनी त्यास दि. १२/०२/२०२६ रोजी तपासकामी ताब्यात घेतले आहे. सदर गुन्हयाच्या एकंदरीत तपासात अटक आरोपीतांकडून एकुण १९६०ग्रॅम, मेफॅड्रॉन, एकुणकिं.रु. ३,९२,००,०००/- (तीन कोटी ब्यान्नव लाख रु) चा ऐवज व ३५,०९,०००/- रु किमतीचे आरोपीचे मोबाईल, फॉर्च्यूनर गाडी व तत्सम साहित्य असा एकुण ४,२७,०९,०००/- (चार कोटी, सत्तावीस लाख, नऊ हजार रुपये) किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन सदर गुन्हयात एकुण ०६ आरोपींना अटक करुन एम डी रॅकेटमध्ये सक्रिय असणारी टोळी उध्वस्त करण्याची मोलाची कामगिरी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक, श्री रविंद्र गोडसे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री. मनोजकुमार पाटील, शहर, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ७, पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. पोलीस उप आयुक्त, पुणे शहर श्री निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, खराडी विभाग, पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनावणे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पोलीस ठाणे, पुणे शहर श्री. संजय चव्हाण, प्रभारी पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थविरोधी शाखा युनिट २, पुणे शहर, श्री पंडीत रेजितवाड, खराडी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी श्री. रविंद्र गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक, श्री राहुल कोळपे, पोलीस उप निरीक्षक व तपास पथकातील पोलीस अंमलदार श्री श्रीकांत शेंडे, श्री महेश नाणेकर, श्री सचिन पाटील, श्री सुरेंद्र साबळे, श्रीमती निलम कर्पे, श्री साहेबराव गुंडाळे, श्रीकांत कोद्रे, तांत्रिक विश्लेषक श्री सुरज जाधव, श्री विलास केदारी, श्री अशोक केदार, वाघोली पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक श्री मनोज बागल, पोलीस अंमलदार श्री पांडुरंग माने, श्री गहिनीनाथ बोयणे, श्री सुनिल कुसाळकर, लोणीकंद पोलीस ठाण्याचे श्री अमोल ढोणे, विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक श्री नितीन राठोड, व पोलीस अंमलदार श्री अंकुश जोगदंड, श्री लालु क-हे, श्री राहुल जोशी, तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहा पोलीस निरीक्षक श्री नितीनकुमार नाईक व पोलीस अंमलदार श्री अमोल सोनवणे, श्री संदीप जाधव, परिमंडळ ७ कार्यालयाचे तांत्रिक विश्लेषक श्री प्रविण गव्हाणे यांनी केली.




