रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्याला मारली लाथ, व्हिडीओ व्हायरल

जालना – रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. अर्जून खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी काहीसा दुरावा निर्माण झाला होता. मात्र रावसाहेब दानवे यांच्या एका व्हायरल व्हिडीओच्या निमित्ताने पुन्हा एकदा अर्जून खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात पॅचअप झाल्याचे दिसतंय. सध्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतील नेते एकमेकांचा प्रचार करताना दिसताय. अशातच रावसाहेब दानवेंनी अर्जून खोतकरांचं स्वागत करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये रावसाहेब दानवेंनी एका कार्यकर्त्यांला लाथ मारल्याचे पाहायला मिळतंय. या व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर रावसाहेब दानवेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर काहिंनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भाजप नेते रावसाहेब दानवे हे निवडणुकीच्या कार्यकाळात अनेकदा चर्चेत असताना आपण पाहिलं आहे. त्यात आता एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याने एकच चर्चा रंगली आहे. रावसाहेब दानवे यांनी आपल्या कार्यकर्त्याला लाथ मारत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. या व्हिडिओत अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे हे एकत्र दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही नेत्यांनी पत्रकांसोबत संवाद साधताना आता झाले गेले विसरून, आम्ही पुढे जाऊ, असे सांगत दिलजमाईवर केली होती.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




