विधीसंघर्षीत बालकाकडुन एक गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत..!

दिनांक ०४/०२/२०२६ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफसह पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, एक विधीसंघर्षीत बालक हा नवले पुलाकडुन कात्रजकडे येणारे मुख्य रोडचे दरम्यान राधाकृष्ण गार्डन समोरील बाजुचे सर्व्हस रोडवर गावठी बनावटीचा पिस्टल घेवुन थांबला आहे.
सदरची बातमी मिळताच लागलीच पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व नमुद पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन बातमी प्रमाणे इसमाचा शोध घेतला असता एक विधीसंघर्षीत बालक हा त्याचे ताब्यात ५०,०००/- रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचा कट्टा सहीत मिळुन आल्याने त्याचेकडुन गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत करुन, त्याचेकडे अधिक तपास करता त्यास सदरचा गावठी कट्टा हा त्याचा साथीदार याने दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्या दोघांविरुध्द सरकारतर्फे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. ४२/२०२६ भारतीय हत्यार अधिनियम कलम ३, २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री.राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २, श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे, श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार व संदीप आगळे यांनी केली.




