गोडवुन फोडुन तांब्याच्या तारा चोरी करणा-या ०३ सराईतांना केले जेरबंद..!

दि.२७/०२/२०२५ रोजी रात्रौ ते दिनांक २८/०२/२०२५ रोजी मौजे वाघोली येथील गट नं. १३६१ बी/२/४ जैन वेअर हाऊस व रिमश्री कॉपर इंडिया प्रा.लि लोहगाव रोड वाघोली ता. हवेली जि. पुणे येथील गोडावुन फोडुन २५,००,०००/-रु किं.च्या ताब्यांचे तारा व ताब्यांचे स्क्रॅप चोरीस गेले होते. त्याबाबत वाघोली पोलीस स्टेशन गु.रजि.नं.६९/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) दाखल आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पो स्टे यांचे मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस स्टेशन तपास पथकाने एकुण १७२ सी.सी.टी.व्ही ची पाहणी करुन तसेच तांत्रिक विश्लेषणच्या आधारे नमुद गुन्ह्यातील ०३ सराईत आरोपी नामे १) राजेंद्र मोतीचंद जैन वय-५२ वर्षे रा.२७०, रे रोड, मानकेश्वर बिल्डींग, बॅरीस्टर, मुंबई नंबर १० (दुकान पत्ता). सध्या रा.३०३ बी-विंग, राजेंद्र मोतीचंद जैन मुंबई १०, सैफी पार्क. (२) विनोद श्रीपाल जैन, वय-४० वर्षे, व्यवसाय, रा. कामाठीपुरा गल्ली नं.०५ बिल्डींग नं.१११, शंकर पापुला एस.पी. रोड मुंबई. सध्या रा.रुम नं.०६, आत्मारामबिल्डींग, ठाकुर द्वार रोड, गिरगाव मुंबई ०२ (३) सोहेल फिरोज शेख, वय-२२ वर्षे, रा. दारुखाना कोळसा बंद, गणेश हॉटेलजवळ, रे रोड मुंबई. यांचे कडुन ६ लाख ४० हजार रु किंमतीचे ताब्यांचे तारा व गुन्हा करण्यासाठी वापरलेला १८ लाख रुपये किं. चा आयशर टेम्पो एकुण २४,४०,०००/-रु किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप आयुक्त परी. ४. पुणे श्री. हिम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शना खाली वाघोली पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे पोलीस उप निरीक्षक वैजीनाथ केदार, पोलीस अंमलदार प्रदिप मोटे, प्रशांत कर्णवर, दिपक कोकरे, विशाल गायकवाड, महादेव कुंभार, साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, प्रितम वाघ, समीर भोरडे, मंगेश जाधव, अमोल गायकवाड यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page