अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाचा खून; आईसह प्रियकराला अटक

पुणे– अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद भागात घडली. याप्रकरणी तरुणाच्या आईसह प्रियकराला अटक करण्यात आली. आईचे अनैतीक संबंध असल्याचं कळाल्यावर मुलाचे आईसोबत वाद वाढायला लागले. याच कारणावरुन आईने मुलाचा जीव घेतल्याची घटना घडली आहे.

अनिल लालसिंग ठाकूर (वय ३०) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अनिलची आई सुमित्रा लालसिंग ठाकूर (वय ५५, रा. वाघमारे वस्ती, पेरणे फाटा, नगर रस्ता) हिला अटक करण्यात आली. याप्रकरणी सुमित्राचा प्रियकर प्र्रफुल्ल पुंडलिक ताथोड (वय ३४, रा. वाघमारे वस्ती, पेरणे फाटा, नगर रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताथोड पसार झाला आहे.

Advertisement

अनिलचा भाऊ सुनील ठाकूर (वय ३२) याने याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुमित्रा आणि तिची मुले अनिल, सुनील मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. ते मजूरी करतात. पेरणे फाटा परिसरातील वाघमारे वस्ती भागात ते राहायला आहेत. या भागात राहणाऱ्या आरोपी प्रफुल्लशी सुमित्राचे अनैतिक संबंध होते. अनैतिक संबंधाची कुणकुण अनिलला लागल्याने त्याची आई सुमित्राशी भांडण झाले होते.

बुधवारी मध्यरात्री सुमित्रा, तिचा प्रियकर प्रफुल्ल यांच्याशी अनिलचा वाद झाला. त्यावेळी प्रफुल्ल आणि सुमित्रा यांनी अनिलला शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यांनी त्याच्या डोक्यात दगड घातला. गंभीर जखमी झालेल्या अनिलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमित्राला अटक करण्यात आली असून, आरोपी प्रफुल्ल पसार झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे तपास करत आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page