महिला विनयभंग प्रकरणी तात्काळ कारवाई २४ तासांत आरोपीस अटक व दोषारोपपत्र दाखल..!

दिनांक ०९/०२/२०२६ रोजी २२/०० वा. काचीगुडा, हैद्राबाद येथून हडपसर, पुणे येथे श्री गणेश ट्रॅव्हल्स या खासगी प्रवासी वाहन क्रमांक AR-01/TR-8969 ने प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशावर (नाव- निर्भया) प्रवासादरम्यान विनयभंग झाल्याची घटना घडली. सदर महिला प्रवासी व तिचे पती ट्रॅव्हल्सच्या स्लीपर सीटवर प्रवास करीत असताना, त्याच वाहनातील आरोपी निशीतकुमार यशवंत सिंग, वय ४७ वर्षे, रा.अपना घर सोसायटी, मिरा रोड, मुंबई याने दि. १०/०२/२०२६ रोजी ०२/०० ते ०४/०० वा. दरम्यान वारंवार पीडितेच्या अंगास स्पर्श करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ९८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७४ अन्वये गुन्हा दाखल केला.

Advertisement

गुन्ह्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय मोगले, यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार, यांनी तपास केला. तपासादरम्यान घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. पीडितेकडील मोबाईलमध्ये घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण असल्याने सदर व्हिडीओ पुरावा पेनड्राईव्हमध्ये उतरवून जप्त करण्यात आला. तसेच साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून ट्रॅव्हल्समधील प्रवासी यादीही प्राप्त करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीस दि. १०/०२/२०२६ रोजी नमुद आरोपी यास अटक करण्यात आली असून, हडपसर पोलीसांनी २४ तासांच्या आत मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री. रंजन कुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ६, श्री. डॉ राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्री. अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे यांचे सुचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार व विनोद शिर्के यांचे पथकाने केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page