पुणे – मुंबई महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात…

पुणे (संपादक अकबर शिकीलगार) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सकाळी सात वाजता निगडी जकात नाक्यासमोर जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात आयशर ट्रक आणि कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली असून या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
Advertisement
अपघातातील जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयशर ट्रक आणि कार ही देहू कडून निगडीच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. आयशर ट्रकला ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला. या घटनेमुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.
Advertisement




